गुजरात-चेन्नईमध्ये अंतिम लढत, जिंकणार कोण? पहा दोन्ही संघांची कामगिरी!

मुंबई : गुजरात टायटन्स संघाने याआधी पाच वेळा चॅम्पियन ठरलेल्या मुंबई इंडियन्सचा पराभव करत सलग दुसऱ्यावर्षी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. आता गतविजेते गुजरात टायटन्स आणि ४ वेळा चॅम्पियन ठरलेल्या चेन्नई सुपर किंग्स यांच्यामध्ये रविवारी, २८ मे रोजी फायनलचा थरार रंगणार आहे.


दोन्ही बाजूला तगडे फलंदाज आहेत. शुभमन गिलसह मिलर, हार्दिक पंड्या, राशिद खान, शिखर भरत असे क्षमतावान फलंदाज गुजरातच्या ताफ्यात आहेत. तर चेन्नईचा संघही यात मागे नाही. देवॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, शिवम दुबे, अजिंक्य रहाणे, रविंद्र जडेजा, महेंद्रसिंह धोनी अशी लांबलचक फलंदाजी त्यांच्याकडे आहे.


गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये गुजरात संघाने दमदार कामगिरी केली आहे. ऑरेंज आणि पर्पल कॅप सुद्धा गुजरातकडेच आहे. सांघिक खेळाच्या बळावर गुजरातने फायनलमध्ये धडक मारली आहे.


२६ मे रोजी झालेल्या सामन्यात गुजरातने मुंबईचा पराभव करत फायनलमध्ये धडक मारली. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर गुजरातने मुंबईचा दारुण पराभव केला. या सामन्यात शुभमन गिल याने शतकी खेळी केली. तर मोहित शर्मा याने पाच विकेट घेण्याचा पराक्रम केला.


२३ मे रोजी झालेल्या क्वालिफायर १ च्या सामन्यात गुजरातला पराभवाचा सामना करावा लागला. चेन्नईने गुजरातचा १५ धावांनी पराभव करत फायनलमध्ये धडक मारली.


२० मे रोजी झालेल्या सामन्यात दिल्लीवर ७७ धावांनी दणदणीत विजय मिळवत चेन्नई सुपर किंग्जने ‘प्ले ऑफ’मध्ये थेट प्रवेश केला.



आयपीएलच्या सोळाव्या हंगामाची सुरुवात चेन्नई आणि गुजरात यांच्यातील सामन्याने झाली होती.


यंदाच्या हंगामात साखळी फेरीत खेळताना... (खालील लिंकवर क्लिक करा आणि सविस्तर बातमी पहा)

 

> ३१ मार्च - पहिल्याच सामन्यात गुजरातने चेन्नईचा पाच विकेटने पराभव केला.


> ३ एप्रिल - चेन्नईने लखनऊवर रोमहर्षक विजय मिळवला.


> ४ एप्रिल - गुजरातने दिल्लीचा सहा विकेटने पराभव केला.


> ८ एप्रिल - चेन्नईने मुंबईचा सात विकेट्स राखून पराभव केला.


> ९ एप्रिल - कोलकात्याने गुजरातचा तीन विकेटने पराभव केला.


> १२ एप्रिल - राजस्थानचा चेन्नईवर ३ धावांनी रोमांचक विजय


> १३ एप्रिल - गुजरातने पंजाबचा सहा विकेटने पराभव केला.


> १६ एप्रिल - राजस्थानने गुजरातचा तीन विकेटने पराभव केला.


> १७ एप्रिल - चेन्नई सुपर किंग्सची आरसीबीवर बाजी.


> २१ एप्रिल - चेन्नईचा हैदराबादवर ७ विकेट राखून सुपर विजय.


> २२ एप्रिल - गुजरातचा लखनऊवर सात धावांनी विजय.


> २३ एप्रिल - चेन्नईचा कोलकात्यावर ४९ धावांनी सहज विजय.


> २५ एप्रिल - गुजरातचा मुंबईवर ५५ धावांनी विजय.


> २७ एप्रिल - ‘चेन्नई एक्स्प्रेस’ रोखण्यात राजस्थान यशस्वी.


> २९ एप्रिल - गुजरातने कोलकाताचा सात विकेटने पराभव केला.


> ३० एप्रिल - पंजाबचा चेन्नईवर रोमांचक विजय.


> २ मे - दिल्लीने गुजरातला पाच धावांनी हरवले.


> ५ मे - गुजरातने राजस्थानवर नऊ विकेटने विजय मिळवला.


> ६ मे - चेन्नईने केला मुंबईचा सहा विकेटने पराभव.


> ७ मे - गुजरातने लखनऊचा ५६ धावांनी पराभव केला.


> १० मे - चेन्नईकडून दिल्ली सर


> १२ मे - मुंबईने वानखेडेवर गुजरातचा २७ धावांनी पराभव केला.


> १४ मे - कोलकाताचा चेन्नईवर ६ विकेट राखून सहज विजय.


> १५ मे - गुजरातने केला हैदराबादचा पराभव.


> २० मे - दिल्लीला झुकवत चेन्नईची आगेकूच.


> २१ मे - अखेरच्या साखळी सामन्यात गुजरातने आरसीबीचा पराभव केला.

Comments
Add Comment

Tiwana Football Club : वांद्र्यातील नेव्हिल डि'सूजा फुटबॉल मैदानावर तिवाना संघाची बाजी

- मुंबई फुटबॉल असोसिएशन फर्स्ट डिव्हिजन २०२६ च्या चषकावर कोरले नाव मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई फुटबॉल

India vs Thailand Women T20 Asia Cup 2026 : भारताचा थायलंडवर ९४ धावांनी दणदणीत विजय; शेफाली वर्माची तुफानी खेळी

दुबई : महिला टी-२० आशिया कप २०२६च्या सलामीच्या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने थायलंडचा ९४ धावांनी पराभव

ENG vs PAK Test Match : लॉर्ड्सवर पाकिस्तानचा ‘काळा दिवस’; १९४ धावांत ऑलआऊट, WTC फायनलच्या शर्यतीतून बाहेर!

लॉर्ड्स : इंग्लंडविरुद्धच्या लॉर्ड्स कसोटीत पाकिस्तानला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. ३८९ धावांच्या

Kagiso Rabada : कागिसो रबाडा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकण्याची शक्यता

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेच्या सुरुवातीपूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे.

Roger Federer : रॉजर फेडररचा 'टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश

नवी दिल्ली : ऱ्होड आयलंडमधील न्यूपोर्ट येथे 'इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश होताना २० वेळा ग्रँडस्लॅम

Dwayne Bravo No. 47 retired : ट्रिनबागो नाइट रायडर्सकडून ड्वेन ब्राव्होची ४७ क्रमांकाची जर्सी निवृत्त

नवी दिल्ली : ट्रिनबागो नाइट रायडर्स (टीकेआर) संघाने ड्वेन ब्राव्होची प्रतिष्ठित ४७ क्रमांकाची जर्सी निवृत्त