Ashish Shelar : 'मातोश्रीच्या बाहेरच्या डबक्यात कागदी होड्या सोडायच्या वयात हे... इन्हे कोई लौटा दो बचपन का सावन'

आशिष शेलारांची आदित्य ठाकरेंवर खोचक टीका


मुंबई : मुंबईत पहिल्याच पावसात पाणी तुंबल्यावरुन भाजप (BJP) आणि ठाकरे गटात (Thackeray Gat) चांगलेच राजकारण तापले आहे. ठाकरे गटाकडून नालेसफाईवर टीका करण्यात येत आहे तर भाजपचे नेते यावर आक्रमक होऊन आपली भूमिका मांडत आहेत. यातच ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) ट्विट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर (Eknath Shinde) नालेसफाई झाली नसल्याचा आरोप केला. यावर भाजपचे नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी ट्विटद्वारे आदित्य ठाकरे यांच्यावर खोचक टीका केली.


'तमाशामधील आबुराव आणि बाबुराव एकापेक्षा एक फेकम फाक करुन मनोरंजन करतात. उबाठाचे विश्वविख्यात प्रवक्ते आबुरावपेक्षा कमी नाहीत. काल मातोश्रीच्या युवराजांनी बाबुरावची जागा घेतली', असं म्हणत आशिष शेलारांनी आदित्य ठाकरेंची खिल्ली उडवली.



युवराज मुंबईची आकडेवारी सांगतात की चेरापुंजीची?

पुढे आदित्य ठाकरेंच्या पत्रकार परिषदेची एक व्हिडीओ क्लिप शेअर करत आशिष शेलार म्हणाले की, 'म्हणे, त्यांच्या कार्यकाळात मुंबईत एका तासाला ४०० मिमी पाऊस झाला, त्याचे यशस्वी व्यवस्थापन त्यांनी केले. मुंबईत एका तासात ४०० मिमी? कधी एवढा पाऊस पडला? युवराज मुंबईची आकडेवारी सांगतात, की चेरापुंजीची? मुंबईत २६ जुलै २००५ ला पण एवढा पाऊस एका तासात झाला नव्हता.' यामुळे आदित्य ठाकरेंच्या आपल्या कार्यकाळाच्या वेळी ४०० मिमी प्रतितास पाऊस होत होता, तेव्हा मी, महापौर किंवा उद्धव ठाकरे रस्त्यावर उतरुन लोकांचे प्रश्न सोडवत होतो, या विधानाला आशिष शेलारांनी चपराक लगावली आहे.





इन्हे कोई लौटा दो बचपन का सावन

आशिष शेलार यांनी पुढे म्हटले की, 'यांची फेकंम् फाक तर त्या आबुराव, बाबुरावपेक्षा ही भयंकर! मुंबईकर हो, दोष युवराजांचा नाही, मातोश्रीच्या बाहेरच्या डबक्यात कागदी होड्या सोडायच्या वयात हे मुंबईच्या पावसावर बोलणार तर असेच होणार ना? म्हणून युवराजांसाठी आमची प्रार्थना... इन्हे कोई लौटा दो बचपन का सावन, वो काग़ज़ कि कश्ती, वो बारिश का पानी!' या शब्दांत आशिष शेलारांनी आदित्य ठाकरेंचा समाचार घेतला.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Jaykumar Rawal : अत्याधुनिक सुविधा आणि सुरक्षिततेला प्राधान्य देत मुंबई विमानतळाजवळ ‘नंदगिरी राज्य अतिथीगृह’ उभारणार; मंत्री जयकुमार रावल यांची माहिती

मुंबई : विविध राज्यांतून मुंबईत येणाऱ्या मान्यवर अतिथींच्या निवासासोबतच ट्रान्झिट प्रवासादरम्यान

Nitesh Rane : मालेगावमध्ये आधुनिक मासळी बाजार उभारणीला गती

- सांगलीतील प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश मुंबई : वाशिम जिल्ह्यातील

Nitesh Rane : सिंधुदुर्गात कुक्कुटपालनाला चालना देण्यासाठी प्रभावी कार्यवाहीचे निर्देश; मंत्री नितेश राणे यांची माहिती

कुक्कुटपालनाला 'कृषी समकक्ष' दर्जा दिल्याने युवकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यात

Mumbai Trees Damaged by Cables : टेलिकॉम कंपन्यांच्या केबल्सचा झाडांना विळखा

तातडीने उपाययोजना राबवून कारवाई करण्याची वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत मागणी मुंबई : मुंबईत सध्या इंटरनेट,

Devendra Fadnavis : सुट्या खाद्य तेलाच्या विक्रीस वर्षभराची मुदतवाढ; मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय

पारंपरिक व्यावसायिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी समिती स्थापन करणार मुंबई : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए)

Ashish Shelar : दहिसर 'ट्रान्सपोर्ट हब'च्या कामादरम्यान 'ब्लास्टिंग' नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई करा!

- पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश; बाधित इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट, खनिज वाहतुकीची चौकशी करावी मुंबई : दहिसर