Ashish Shelar : दहिसर 'ट्रान्सपोर्ट हब'च्या कामादरम्यान 'ब्लास्टिंग' नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई करा!

- पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश; बाधित इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट, खनिज वाहतुकीची चौकशी करावी


मुंबई : दहिसर पूर्व जकात नाका येथे होत असलेल्या 'ट्रान्सपोर्ट हब'च्या कामादरम्यान होणाऱ्या ब्लास्टिंगमुळे परिसरातील इमारतींना तडे जाणे, ध्वनी प्रदूषण तसेच नागरिकांना होणाऱ्या त्रासाच्या तक्रारींची गंभीर दखल घेत, यापूर्वी नियमांचे उल्लंघन झाले असल्यास संबंधित कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करावी, असे निर्देश मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी मंगळवारी दिले. (Ashish Shelar)

ट्रान्सपोर्ट हबच्या कामासंदर्भात पालकमंत्री आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयील दालनात झालेल्या बैठकीत आमदार प्रकाश सुर्वे, अमदार मनिषा चौधरी, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्राजक्ता लवंगारे यांच्यासह पर्यावरण, पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ब्लास्टिंगमुळे होणाऱ्या कंपनांचे यापूर्वी आयआयटीमार्फत परीक्षण करण्यात आले असून, त्यांच्या सूचनेनुसार नियंत्रित पद्धतीने ब्लास्टिंग करण्यात येत असल्याचे महानगरपालिकेकडून सांगण्यात आले. मात्र, निर्धारित वेळा व अन्य सुरक्षा अटींचे यापूर्वी उल्लंघन झाले असल्यास त्याची नोंद घेऊन संबंधित कंत्राटदारावर कारवाई करावी. तसेच अधिक सुरक्षित व प्रगत ब्लास्टिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्याबाबतही विचार करावा, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. (Ashish Shelar)




ब्लास्टिंगमुळे इमारतींना झालेल्या नुकसानीच्या तक्रारींची तज्ज्ञांमार्फत तपासणी करून स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल तयार करावा. तसेच ब्लास्टिंगमुळे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाल्यास संबंधितांकडून नुकसानभरपाईची कार्यवाही करावी, असेही पालकमंत्री शेलार यांनी सांगितले. ट्रान्सपोर्ट हबच्या कामातून निघणाऱ्या खनिज व गौण खनिजाच्या वाहतुकीबाबत आवश्यक परवानग्या, रॉयल्टी आणि मानक कार्यपद्धतीचे पालन होत आहे का, याची मुंबई उपनगर जिल्हाधिकारी व मुंबई महानगरपालिकेने चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. (Ashish Shelar)



परिसरातील नागरिकांना वाहतूक कोंडी, धूळ, दुर्गंधी, ध्वनी प्रदूषण आणि ये-जा यांसंदर्भात होणाऱ्या त्रासाबाबत संबंधित प्रकल्प अभियंता तसेच पोलीस विभागाने नागरिकांची जनसुनावणी घ्यावी. या सुनावणीचा अहवाल १५ दिवसांत सादर करावा, असे पालकमंत्री शेलार यांनी निर्देशित केले. विकासकामे आवश्यक असली तरी नागरिकांच्या सुरक्षिततेशी तडजोड सहन केली जाणार नाही. नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी आणि नागरिकांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करावे, असे मुंबई उपनगर पालकमंत्री शेलार यांनी सांगितले. (Ashish Shelar)
Comments
Add Comment

वैद्यकीय तज्ज्ञांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दिले आरोग्याचे धडे, ‘मुख्यमंत्री आरोग्य संवाद’ उपक्रमाला तरूण- तरूणींचा उत्सफुर्त प्रतिसाद

मुंबई: बदलती जीवनशैली, मोबाईलचा वाढता वापर, अपुरी झोप, चुकीच्या आहाराच्या सवयी आणि मानसिक ताण या वेगवेगळ्या

मुंबईत दीड वर्षांच्या मुलीला सहाव्या मजल्यावरून ढकललं, आरोपीच्या आईनं पुरावे नष्ट करण्यासाठी वापरली शक्कल

मुंबई: मुंबईतल्या गोरेगाव पूर्वेतील दिंडोशी परिसरामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गोरेगाव पूर्वेतील

abvp protest mumbai university : ‘बांगलादेशसारख्या अराजकतेला भारतात थारा नको!’; संविधानाच्या रक्षणासाठी मुंबई विद्यापीठात अभाविपतर्फे भव्य स्वाक्षरी अभियान व निदर्शने

मुंबई : देशातील लोकशाही व्यवस्था मजबूत राखणे, भारतीय संविधानाच्या मूल्यांचे रक्षण करणे आणि राष्ट्रीय एकात्मता

Virar News: विरारमध्ये ज्युनिअर आर्टिस्टची आत्महत्या, अश्लील व्हिडिओंच्या आधारे कोट्यवधींची खंडणी उकळल्याचा आरोप

विरार: अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तब्बल एक कोटी रुपयांची खंडणी उकळल्याच्या प्रकाराला कंटाळून

Versova Beach Dead Body : वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर गोणीत सापडला मृतदेह; 6 आरोपींना अटक

मुंबई : मुंबईतील वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर 1 ऑक्टोबर रोजी गोणीत एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती.

Vidhan Parishad Election : विधान परिषद निवडणुकीत महायुतीत शह-काटशहाचे राजकारण; पुणे, अमरावती, छत्रपती संभाजीनगरमध्ये कुरघोड्या!

मुंबई : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत महायुतीतील अंतर्गत मतभेद उघड होऊ लागले