Talathi Exam Timetable change : सर्व्हर डाऊनच्या गोंधळामुळे तलाठी परिक्षेच्या पुढील दोन्ही सत्रांमध्ये दीड तास उशीर

विद्यार्थ्यांना भोगावा लागतोय नाहक त्रास


पुणे : आज महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यांमध्ये तलाठी भरती परीक्षा (Talathi Exam) पार पडते आहे. परंतु सकाळी पहिल्या सत्रापूर्वीच सर्व्हर डाऊन झाल्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचा खोळंबा झाला होता. छत्रपती संभाजीनगर, अमरावती, अकोला, नागपूर, लातूर या जिल्ह्यांमध्ये परीक्षा केंद्रांवर सर्व्हर डाऊन (Server down) होते. सकाळी ९ ते ११ ही परिक्षेची वेळ दिलेली असताना साधारण पावणेदहाच्या सुमारास सर्व्हर्स पूर्ववत झाले. यामुळे विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला असून आता पुढील दोन्ही सत्रांच्या परिक्षाही दीड तास उशिरा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व परीक्षा केंद्रांबाहेर तसे बोर्ड लावण्यात आले आहेत.


अगोदर दिलेल्या वेळेप्रमाणे तलाठी परिक्षेचे पहिले सत्र सकाळी ९ ते ११, दुसरे सत्र १२:३० ते २:३० तर तिसरे सत्र ४ ते ६ या वेळेत पार पडणार होते. मात्र सर्व्हर डाऊनच्या गोंधळामुळे आता प्रत्येक सत्र दीड तास पुढे ढकलण्यात आले आहे. यानुसार दुसरे सत्र दुपारी २ ते ४ या वेळेत होईल तर तिसरे सत्र ५:३० ते ७:३० या वेळेत होणार आहे. पहिल्या सत्रासाठी ज्या वेळेस प्रत्येक परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरु करण्यात आली त्यानुसार पुढील दोन तासांचा पूर्ण वेळ दिला जाणार आहे.


परीक्षा आता जरी व्यवस्थित सुरु असली तरी यात विद्यार्थ्यांचे हाल होणार आहेत. काही विद्यार्थी केवळ परिक्षेकरता दुसर्‍या जिल्ह्यातून आले आहेत व त्यांनी परतीचे तिकीटही बुक केले आहे. आता तब्बल दीड तास उशीर होणार असल्याने या विद्यार्थ्यांच्या रेल्वे हमखास चुकणार आहेत. विद्यार्थ्यांची काहीही चूक नसताना त्यांना या सगळ्या प्रकाराला सामोरे जावे लागत असल्याने त्यांच्यासोबत आलेले नातेवाईकही संतप्त झाले आहेत.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी