Green hydrogen : ग्रीन हायड्रोजनच भविष्यातील इंधन - केंद्रीय मंत्री हरदीप पुरी

नवी दिल्ली : भारतात इंधनाचा वापर जगातील इतर देशांच्या तुलनेत तिप्पट आहे. आज तुम्हाला इंधनाच्या वापरातून अर्थव्यवस्थेच्या विकासाची कल्पना येऊ शकते. ग्रीन हायड्रोजन (Green hydrogen) हे भविष्यातील इंधन आहे, असे केंद्रीय मंत्री हरदीप पुरी (Hardeep Puri) म्हणाले.


एनडीटीव्ही कॉन्क्लेव्हमध्ये बोलताना केंद्रीय मंत्री हरदीप पुरी म्हणाले की, "आज तुम्हाला इंधनाच्या वापरातून अर्थव्यवस्थेच्या विकासाची कल्पना येऊ शकते. ग्रीन हायड्रोजन हे भविष्यातील इंधन आहे. आज नाही तर उद्या ग्रीन फ्युएल फॉसिल फ्युएलच्या किमतीत मिळेल. आणि हे लवकरच होईल."


"भविष्यात भारत १० ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनू शकतो"


केंद्रीय मंत्री पुढे बोलताना म्हणाले की, भारतानं दहाव्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेपासून पाचव्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेचा प्रवास केला आहे. भविष्यात भारत १० ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनू शकेल याबद्दल कोणालाही शंका नाही. तसेच, पुरी यांनी बोलताना मॉर्गन स्टॅन्ले यांच्या वक्तव्याचा देखील दाखला दिला. ते म्हणाले की, मॉर्गन स्टॅन्ले यांचं म्हणणं आहे की, भारताचं भविष्य हे चीनच्या भूतकाळासारखं असेल.


ते म्हणाले की, "२०२१ मध्ये लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रीन हायड्रोजनचा अवलंब करण्याबाबत सांगितलं तेव्हा अनेकांनी त्यावर प्रश्न उपस्थित केले. लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात ज्यावेळी पंतप्रधान असं मोठं वक्तव्य करतात, त्यावेळी नक्कीच काहीतरी अर्थ असतो.

Comments
Add Comment

Tata Javelin Missile : भारतात टाटा बनवणार टँकविरोधी मिसाईल सिस्टीम जॅव्हलिन; अमेरिकन कंपनीसोबत करार

नवी दिल्ली : भारताने अमेरिकेकडून टँकविरोधी मिसाईल सिस्टीम एफजीएम-148 जॅव्हलिन खरेदी करण्याचा करार केला आहे.

Kiren Rijiju : न्यूयॉर्कमध्ये भारतीय राष्ट्रध्वजाच्या अवमानावर किरेन रिजिजू संतप्त

नवी दिल्ली : न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे झालेल्या निदर्शनांदरम्यान भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान

Dhirendra Pratap Singh Murder Case : धीरेंद्र प्रताप सिंह हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; जवळच्याच व्यक्तीने आखला हत्येचा कट

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये महाराणा प्रताप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धीरेंद्र प्रताप सिंह (४५)

Greater Noida Accident : ग्रेटर नोएडात भीषण अपघात; ट्रेलर डिव्हायडर तोडून कारवर आदळला, 4 जणांचा मृत्यू

ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडातील जेवर परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा

MK Stalin Security Downgraded : तामिळनाडू सरकारचा निर्णय, माजी मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या सुरक्षेत कपात

चेन्नई : तामिळनाडू पोलिसांनी सुरक्षा प्राप्त राजकीय नेत्यांना असलेल्या धोक्याचे वेळोवेळी केलेल्या आकलनानंतर