Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेसच्या जेवणात आढळला लोखंडी बोल्ट; प्रवाशाचा व्हिडिओ व्हायरल, IRCTCकडून माफी

वंदे भारत एक्सप्रेसमधील जेवणाच्या गुणवत्तेबाबत गंभीर तक्रार समोर आली आहे. बंगळूरुहून बेळगावीला प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाला जेवणात लोखंडी बोल्ट आढळला. प्रवाशाने या घटनेचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर शेअर करत भारतीय रेल्वे आणि आयआरसीटीसीकडे तक्रार केली

Vande Bharat Express: वंदे भारत एक्सप्रेसमधील जेवणाच्या गुणवत्तेबाबत गंभीर तक्रार समोर आली आहे. बंगळूरुहून बेळगावीला प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाला जेवणात लोखंडी बोल्ट आढळला. प्रवाशाने या घटनेचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर शेअर करत भारतीय रेल्वे आणि आयआरसीटीसीकडे तक्रार केली. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वेच्या खानपान सेवेच्या गुणवत्तेवर पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत.

वड्याच्या शेजारी दिसला मोठा लोखंडी बोल्ट


समर्थ कोडियाल यांनी 28 नोव्हेंबर रोजी बंगळूरु ते बेळगावी प्रवासादरम्यान हा प्रकार अनुभवला. त्यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये जेवणातील वडा दोन तुकड्यांमध्ये तुटलेला दिसत असून, त्याच्या शेजारी मोठा धातूचा बोल्ट आढळतो. जेवणात अशा प्रकारची वस्तू सापडणे ही गंभीर बाब असल्याचे सांगत त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली.

आपल्या पोस्टमध्ये त्यांनी संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांना टॅग करून जेवणाच्या गुणवत्तेतील त्रुटीकडे लक्ष वेधले.

IRCTCकडून माफी; सेवा पुरवठादारावर कारवाई


प्रवाशाच्या तक्रारीला उत्तर देताना इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने (IRCTC) झालेल्या गैरसोयीबद्दल माफी मागितली. तसेच संबंधित खानपान सेवा पुरवठादारावर कठोर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याचे सांगितले.



स्वयंपाकघरातील कर्मचाऱ्यांना ठरवून दिलेल्या प्रमाणित कार्यपद्धतीचे (SOP) काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय स्वयंपाकघरातील उपकरणांची तपासणी करण्याचे आणि अन्न तयार करण्यापूर्वी सर्व उपकरणे योग्य स्थितीत असल्याची खात्री करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

रेल्वेच्या खानपान सेवेच्या गुणवत्तेवर प्रश्न


वंदे भारत एक्सप्रेसमधील या घटनेमुळे रेल्वेच्या जेवणाच्या दर्जासोबतच अन्नसुरक्षेचा मुद्दाही चर्चेत आला आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी स्वयंपाकघर आणि अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेवर अधिक लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

 
Comments
Add Comment

Haridwar Kumbh 2027 : हरिद्वार कुंभ 2027 मध्ये ‘नेत्र कुंभ’चे आयोजन; 1.5 लाख भाविकांची मोफत नेत्रतपासणी, 10 हजार शस्त्रक्रियांचे लक्ष्य

Haridwar Kumbh 2027: हरिद्वार कुंभमेळा 2027 च्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी 45 दिवसांचे ‘नेत्र कुंभ’ महाशिबिर आयोजित करण्यात

'काशी तमिळ संगमम ५.०'ला सुरुवात, २०७ प्रतिनिधींची पहिली तुकडी विशेष रेल्वेने वाराणसीकडे रवाना

चेन्नई : तमिळनाडू आणि काशी यांच्यातील ऐतिहासिक व सांस्कृतिक नाते अधिक दृढ करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या

Man Ki Baat : 'मन की बात'च्या 140व्या भागातून PM नरेंद्र मोदींचा देशाला संदेश ! नशामुक्त भारतासह अनेक महत्त्वाच्या विषयांवर भाष्य

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या मासिक रेडिओ कार्यक्रम ‘मन की बात’च्या १४०व्या भागातून

Medicare Rules : अमेरिकेत 3 लाख कायदेशीर स्थलांतरितांना मोठा धक्का ! ट्रम्प सरकारचा मेडिकेअरबाबत नवा नियम

अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प सरकारने मेडिकेअर या सरकारी आरोग्य विमा योजनेच्या नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. या

Russia Ukraine War : रशिया-युक्रेन युद्ध पुन्हा भडकले ! एकीकडे नागरिकांचा मृत्यू, तर दुसरीकडे तेल प्रकल्पांवर ड्रोन हल्ले

Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध अधिक तीव्र झाले असून दोन्ही देशांकडून एकमेकांवर ड्रोन हल्ल्यांची

देव दर्शनाला निघालेल्या भक्तांवर काळाचा घाला! रांची- पटना महामार्गावर स्कॉर्पियोचा भीषण अपघात; 4 चिमुकल्यांसह 13 जणांचा जागीच मृत्यू

मुंबई: झारखंडमधील रामगड जिल्ह्यातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि मन हेलावून टाकणारी बातमी समोर आली आहे. रांची-पटना