Maratha Reservation : जरांगे यांच्या आरक्षणाच्या मागणीला उत्स्फूर्त पाठिंबा

कुणाल दराडे यांनी घेतली उपोषणकर्ते जरांगे यांची भेट


येवला : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावे या न्याय मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी (ता.अंबड) येथे आमरण उपोषण करणारे मनोज जरांगे- पाटील यांची शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुणाल दराडे यांनी आज भेट घेऊन आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा दिला.


कुणाल दराडे यांनी जरांगे पाटील यांची आज भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस करत मराठा आरक्षणास पाठींबा दर्शविला. याप्रसंगी उपस्थित ग्रामस्थ, समाजाचे पदाधिकारी व प्रतिनिधींशी चर्चा करून मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी पाठिंबा व्यक्त केला. जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली असून त्यांना उपोषण स्थळीच सलाईन देखील लावलेले आहे. दिवसेंदिवस प्रकृती खालावत असल्यामुळे त्यांच्या प्रकृतीचा विचार करून सरकारने वेगाने पावले उचलून आरक्षणासंदर्भात ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी यावेळी दराडे यांनी केली. यावेळी डॉ. विलास कांगणे, मकरंद तक्ते आदी उपस्थित होते.


याप्रसंगी येवला तालुका सकल मराठा समाज व अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने कुणाल दराडे यांचे आभार व्यक्त केले.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Dagdusheth Halwai Ganpati : कारगिल, जम्मू, अयोध्या, राजस्थानसह सीमावर्ती भागात ‘दगडूशेठ’ गणपतीची प्रतिष्ठापना

पुणे : महाराष्ट्रासह देशभरात प्रसिद्ध असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची (Dagdusheth Halwai Ganpati) भक्ती देशाच्या सीमेवर

MahaBhumi Stack : आता एका क्लिकवर मिळणार जमीन सर्च रिपोर्ट! महाराष्ट्रात महाभूमी स्टॅकचा मोठा निर्णय

मुंबई : राज्यातील जमीन व्यवहार अधिक पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी महसूल व वन विभागाने ‘महाभूमी स्टॅक’ ही

Dr Sampada Munde Case : डॉ. संपदा मुंडे आत्महत्येप्रकरणी छाननी समिती स्थापन

मुंबई : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमण्यात

Maharashtra Weather Update : सप्टेंबरच्या सुरुवातीलाच हवामान बदलणार; विदर्भात जोरदार पावसाची शक्यता

मुंबई : महाराष्ट्रात ऑगस्ट महिन्यात पावसाने काहीशी ओढ दिल्यानंतर सप्टेंबरच्या सुरुवातीला हवामानात बदल

Jalgaon : काल वाढदिवस...आज काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश, चिमुकल्याला झोळीत गळफास

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे अत्यंत धक्कादायक अन् हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पहिल्या वाढदिवस ,

Medha Kulkarani : धार्मिक उत्सवात अशा कार्यक्रमांची गरज काय...; गणेशोत्सवात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमावरून वाद

पुणे : महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आणि श्रद्धेने साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाला राज्यभरात सुरुवात झाली आहे.