खाकीतून पाझरली माणुसकी

प्रसूतीकळा सोसणाऱ्या महिलेला पोलिस वाहनातून रुग्णालयात केले दाखल


वणी प्रतिनिधी:कडक आवाज, रागीट स्वभाव आणि खाकीचा धाक अशी पोलिसांची ओळख असते परंतु या ‘खाकीत’ असलेल्या माणुसकीचे जेव्हा दर्शन घडतं तेव्हा त्याला सलाम केल्याखेरीज राहता येत नाही. कडक शिस्तीच्या खाकी वर्दीच्या पलीकडे देखील माणुसकी असते. पोलीस सुद्धा याच समाजाचा एक घटक आहे त्याला पण संवेदनशील मन असते याचीच प्रचिती शुक्रवार, ता. ८ रोजी पहाटे वणी - नाशिक रस्त्यावरील लखमापूर फाटा येथे घडली. प्रसूती कळा सूरु असल्याने रुग्णालयात जाण्यासाठी वाहानाच्या प्रतिक्षेत असलेल्या मेंढपाळ महिलेला वेळीच पोलिस वाहनातून रुग्णालयात दाखल करीत माणुसकीचे दर्शन घडवले आहेत. त्यांच्या या कामगिरीमुळे सर्वच स्थरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.घटना अशी की, ता. ८ रोजी पहाटे १ वाजेचे सुमारास वणी पोलिस स्टेशन हद्दीत वणी पोलिस स्टेशनचे पोलिस व्हॅन दरम्यान लखमापुर फाटयावर जोरदार सुरु असलेल्या पावसात बंटु दामु बिचकुले रा, नांदवन, ता. साक्री, जि. धुळे व त्याची गर्भवती पत्नी संगीताबाई वणी व दिंडोरा बाजूकडे जाणाऱ्या वाहनाना हात देत होते. मात्र कोणतेही वाहन थांबत नव्हते. अशा मध्यरात्रीच्या वेळी दीड वाजेच्या सुमारास वणी पोलीस ठाण्याचे वाहन पेट्रोलिंग करीत असतांना महिला व पुरुष भर पावसात उभे असल्याचे बघून चालक विजय बच्छाव यांनी वाहन थांबविले.


यावेळी पोलिस हवालदार पुंडलिक बागूल व बच्छाव यांनी त्यांना काय अडचण आहे असे विचारले असता, त्यांनी सांगितले माझी पत्नी गर्भवती असून तीला प्रसुती कळा सुरु आहेत, आम्ही दवाखान्यात जाण्यासाठी वाहनांना हात देत आहोत , पण वाहन थांबत नसल्याचे सांगितले.यावेळी गरोधर मातेची परिस्थिती बघून वणी पोलिसांनी सदर गर्भवती महिला व तिचे नातेवईक यांना वणी ग्रामीण रुग्णालयामध्ये तात्काळ दाखल केले. त्यानंतर एक ते दिड तासाने सदर महिलेची सुखरूप प्रसुती होऊन कन्येला जन्म दिला आहे.वणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश बोडखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार पुंडलिक बागुल व पोलिस नायक व वाहन चालक विजय बच्छाव यांना कर्तव्यावर असतांना वेळीच मदतीचा हात देवून माणूसकीचे दर्शन घडविल्याने, गर्भवती महिला व तिचे बाळ यांचे प्राण वाचविल्याने नागरिकांकडून पोलिसांचे कौतुक होत आहे."

Comments
Add Comment

Cotton Rate : कापसाच्या दरात तेजीचे संकेत ! भाव 10 हजारांचा टप्पा ओलांडणार? शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या

Cotton Rate : राज्यात यंदा कापूस उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एल निनोचा प्रभाव, पावसातील मोठे

Maharashtra Weather Update: मुंबई-ठाण्यात उष्णतेचा इशारा; कोकणासह देशातील अनेक भागांत पावसाची शक्यता

Maharashtra Weather Update: देशातून नैऋत्य मान्सूनने पूर्णपणे माघार घेतली असली, तरी देशातील हवामानातील बदल सुरूच आहेत. बंगालचा

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि