Barsu Refinery : कोकणातील बारसू रिफायनरी प्रकल्पावर देखरेखीसाठी होणार समिती स्थापन

प्रकल्पाला वेग येणार...


राजापूर : मागच्या काही महिन्यांत सत्ताधारी आणि विरोधकांदरम्यान प्रचंड वादग्रस्त ठरलेल्या कोकणातील बारसू रिफायनरी प्रकल्पाला (Barsu Refinery Project) अखेर वेग येणार आहे. कोकणच्या विकासासाठी प्रस्तावित बारसू तेल शुद्धीकरण प्रकल्पावर देखरेख करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि सौदी अरेबियाचे (Saudi Arabia) राजकुमार मोहम्मद बिन सलमान (Mohammed bin Salman Al Saud) यांच्यात सोमवारी यासंदर्भात सहमती झाली. सुमारे ४ लाख कोटींचा हा प्रकल्प सौदी अरेबियाची अरमाको कंपनी, संयुक्त अरब अमिराती (United Arab Emirates) आणि भारतीय कंपन्यांच्या सहकार्याने उभारला जाणार आहे.


एक दिवसाच्या दौऱ्यावर आलेल्या राजकुमार सलमान यांचे राष्ट्रपती भवनात औपचारिक स्वागत करण्यात आले. तेव्हा बारसू प्रकल्पासंदर्भात एक बैठक पार पडली. या बैठकीत बारसू प्रकल्पामुळे भारत आणि सौदीची मैत्री आणखी दृढ झाल्याच्या भावना पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या. बैठकीत हायड्रोकार्बन, संरक्षण, सेमी कंडक्टर आणि अंतराळ क्षेत्रातील सहकार्य वाढवण्याबाबतही चर्चा झाली. आगामी वर्षात सौदी अरेबिया भारतात ८.२० लाख कोटींची गुंतवणूक करणार आहे.


तेल शुद्धीकरण क्षेत्रातील 'आरामको' या सौदी अरेबियातील क्रूड ऑइल उत्पादित करणाऱ्या कंपनीसोबत केंद्र शासनाचा उपक्रम असलेल्या भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लि., हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लि. आणि इंडियन ऑइल यांच्या संयुक्त विद्यमाने हा रिफायनरी प्रकल्प कोकणातील राजापूर तालुक्यातील नाणार येथील परिसरात सुमारे १३ हजार एकर जागेवर प्रस्तावित आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

कोकणात 125 एकरात उभारणार फिल्म सिटी, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्याकडून कामाला वेग

कोकण: रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील पालशेत गावात शासकीय भूखंडावर चित्रपट निर्मिती आणि पर्यटनाला

Nitesh Rane News: सिंधुदुर्गमधील नुकसानीसाठी स्वतंत्र निकषांचा विचार करा- पालकमंत्री नितेश राणे यांची कृषिमंत्र्यांकडे मागणी

मुंबई: "सिंधुदुर्ग जिल्हा दुष्काळाच्या ट्रिगर-१ मध्ये येत असून, जिल्ह्यातील पिकांच्या नुकसानीचे तातडीने

Ganpati Special Train: गावी जाणाऱ्या गणेशभक्तांना रेल्वेकडून मोठा दिलासा, मुंबई- कोकण मार्गावर धावणार १२ विशेष गाड्या

मुंबई: गणेशोत्सवासाठी मुंबईहून कोकणामध्ये जाणाऱ्या प्रवाशांच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी आहे. मध्य

Nitesh Rane News: गणेशभक्तांना घेऊन पहिली ‘मोदी एक्सप्रेस’ कोकणच्या दिशेने रवाना, मंत्री नितेश राणे यांनी दाखवला हिरवा झेंडा

मुंबई: गणेशोत्सवासाठी कोकणच्या दिशेने निघालेल्या चाकरमान्यांच्या प्रवासाला यंदाही ‘मोदी एक्सप्रेस’ची साथ

Ganpati 2026 Special Train: कोकणवासियांसाठी गणपती विशेष ट्रेन, कुठून कधी धावणार? वाचा संपूर्ण वेळापत्रक

मुंबई: गणेशोत्सवानिमित्त नोकरदारांची आपल्या गावी जाण्यासाठी सध्या एकच गर्दी पाहायला मिळत आहे. रेल्वे, एसटी बस,

Ganesh Utsav 2026 Konkan toll waiver : गणेशभक्तांच्या कोकण प्रवासाला टोलमाफी; अटल सेतू’सह प्रमुख महामार्गांवर पथकर सवलत

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात आपल्या मूळ गावी जाणाऱ्या लाखो गणेशभक्तांना राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे.