कोकण: रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील पालशेत गावात शासकीय भूखंडावर चित्रपट निर्मिती आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी ‘फिल्म टूरिझम’ प्रकल्प उभारण्याबाबत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) संयुक्त भागीदारीत सविस्तर प्रस्ताव तयार करावा, असे निर्देश सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आज दिले. या प्रकल्पासाठी चित्रपट पर्यटन योजनेंतर्गत निधी उपलब्ध करून घेण्याच्या दृष्टीने म्हाडाची मदत घेण्याबाबतही विचार करावा आणि संपूर्ण प्रस्ताव महिनाभरात सादर करावा, असे निर्देश मंत्री शेलार यांनी दिले.
Nashik : ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच नाशिक शहरात उन्हाचा तडाखा वाढला असून, ‘ऑक्टोबर हीट’मुळे नागरिक हैराण झाले आहेत. शुक्रवार, ९ ऑक्टोबर रोजी शहराचे ...
रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील पालशेत गावासह इतरत्र गावातील शासकीय जागांचा उपयोग करून चित्रपट निर्मितीसाठी शासनामार्फत योजना तयार करण्याबाबत मंत्री आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी कोकणात चित्रपट निर्मितीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत विविध सूचना मांडल्या. गुहागर आणि दापोली तालुक्यातील निसर्गरम्य समुद्रकिनारे आणि पर्यटनस्थळे चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी उपयुक्त आहेत. परिसरात अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांचे चित्रीकरण झाले आहे. मात्र, चित्रीकरणासाठी आवश्यक परवानग्या आणि सुविधा वेळेत उपलब्ध होण्यात अडचणी येतात.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सर्वच्या सर्व २१ जागा जिंकत निर्विवाद ...
या पार्श्वभूमीवर चित्रीकरणासाठी एकाच ठिकाणी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्यास चित्रपट निर्मितीला चालना मिळेल. शिवाय, स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असे डॉ. नातू यांनी सांगितले. गुहागर तालुक्यातील पालशेत, वेळणेश्वर आणि तवसाळ येथील शासकीय जागांचा उपयोग करून चित्रपट निर्मितीसाठी आवश्यक सुविधा विकसित करण्याची सूचनाही त्यांनी केली. या जागांवर सार्वजनिक- खासगी भागीदारीच्या (पीपीपी) माध्यमातून सुविधा उभारण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. मौजे पालशेत येथे पर्यटन विभागाची शासनाच्या मालकीची सुमारे 125 एकर जागा उपलब्ध असून, या जागेवर पर्यटन आणि चित्रपट उद्योगाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने पायाभूत सुविधा विकसित कराव्यात, अशी सूचना माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी शासनाकडे केली होती.
Nashik TCS Case : नाशिकच्या बहुचर्चित टीसीएस कंपनीतील तरुणींचा विनयभंग, बलात्कार आणि धर्मांतराच्या प्रयत्नांशी संबंधित प्रकरणातील सुनावणी एकाच न्यायालयात ...
शासनामार्फत जर कोकणामध्ये फिल्मसिटी उभारली तर, जिल्ह्यातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात, असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. या अनुषंगाने मंत्रालयात महत्त्वाची बैठक घेण्यात आली. एमटीडीसीसोबत संयुक्त उपक्रमाच्या माध्यमातून फिल्मसिटी उभारण्याच्या दृष्टीने आवश्यक नियोजन करावे. प्रकल्पासाठी निधी उपलब्धतेचे विविध पर्याय तपासून महिनाभरात सविस्तर प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश मंत्री आशिष शेलार यांनी बैठकीत दिले. या बैठकीस माजी आमदार डॉ. विनय नातू दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव किरण कुलकर्णी, दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील, म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल, एमटीडीसीचे अधिकारी तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.