'शिवसेनेच्या नावावर तुम्ही चोऱ्याच केल्या, ठाकरे पिता-पुत्र म्हणजे जागतिक चोर आणि संजय राऊत हा चिंधीचोर!'

सोलापूर : लंडनमधून महाराष्ट्रात १६ नोव्हेंबर रोजी वाघनखं (Wagh Nakha) मुंबईत आणण्यात येणार आहेत. त्याआधीच ही वाघनखं शिवरायांची आहेत का? यावरुन वाद सुरु झाला आहे. या वादात तोंडसुख घेणारे ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या आरोपांना भाजप प्रवक्ते लक्ष्मण ढोबळे यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. ठाकरे पितापुत्रांवर जोरदार हल्लाबोल करताना ढोबळे म्हणाले की, 'आमदार, खासदार सोडून गेले त्यामुळे ठाकरे पितापुत्र झोपेत बरळतात. उर बडवून घेतात, शिवसेनेच्या नावावर तुम्ही चोऱ्याच केल्या, आंतरराष्ट्रीय चोर म्हणून तुमचा उल्लेख होतो, अशी टीका लक्ष्मण ढोबळे यांनी केली आहे. तर खासदार संजय राऊत यांना भाडेकरू, चिंधीचोर असे म्हणत चांगलेच फटकारले.


लक्ष्मण ढोबळे म्हणाले, शिवरायांच्या नावावर मातोश्री एक, मातोश्री दोन उभारणारे आज वाघनखांवर संशय घेत आहेत. सरकारला विनाकारण बदनाम करणाऱ्यांवर जरब, दहशत बसावी यासाठी ही वाघनखं महाराष्ट्रात आणली जाणार आहेत. या वाघ नखांचा तुम्हाला उपयोग होणार नाही पण तुमच्यावर दहशत राहील.


दुर्दैवाने, गेली ५० वर्षे भगव्या झेंड्याखाली ज्यांनी अध्यात्माची लोकशाही मांडली त्यांचे दिवटे आज छत्रपतींच्या भगव्याला आणि वाघनखांना विरोध करत आहेत. जगातील लोकांना मान्यता दिलेल्या वाघनखांबद्दल पितापुत्र चुकीचे बोलत आहेत. माझा बाप चोरीला गेला असे म्हणतात. चिन्ह गेले, आमदार सोडून गेले तरी देखील वावटळीसारखे ओरडत फिरत आहेत. सरकारला बदनाम करत आहेत, अशा खोटारड्या, रिकामटेकड्या भाषा पंडितांनी हे बंद केले पाहिजे. वाघनखांना पाहून मांजराच्या वाटेने जाणा-यांनी शांत बसावे यासाठी ती वाघनखं आणली जाणार आहेत, असे ढोबळे म्हणाले.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा