इस्त्राईल-हमास युद्धात १३०० जणांचा मृत्यू, २७००हून अधिक जखमी, १.३लाखाहून अधिक बेघर

तेल अवीव: दहशतवादी संघटना हमास आणि इस्त्राईल यांच्यातील संघर्ष काही संपण्याचे नाव घेत नाही. हमासने शनिवारी ७ ऑक्टोबरला इस्त्राईलवर जोरदार हल्ला केला. त्यानंतर इस्त्राईलने या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर देत युद्धाची घोषणा केली.आतापर्यंत दोन्हीकडून झालेल्या हल्ल्यात तब्बल १३००हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.


इस्त्राईलमध्ये ७००हून अधिक जणांनी आपला जीव गमावला आहे तर गाझामध्ये कमीत कमी ५६० जणांचा मृत्यू झाला. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार हमासच्या हल्ल्यात इस्त्राईलमधील कमीत कमी ९०० लोक मारले गेले.


इस्त्राईलच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की हमासने १००पेक्षा जास्त लोकांना बंदी बनवले आहे. परराष्ट्र मंत्री एली कोहेनने म्हटले की इस्त्राईलच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार १०० लोकांना हमासने बंदी बनवले आहे आणि त्यांना गाझा नेण्यात येईल.



तर इस्त्राईलच्या बंदी बनवलेल्या लोकांना मारले जाणार


हमासची सशस्त्र शाखा अल कसम ब्रिगेडने इशारा दिला आहे की जर इस्त्राईलने गाझामध्ये नागरिकांच्या घरावर बॉम्बफेक सुरू ठेवली तर ते इस्त्राईलच्या बंदी बनवलेल्या नागरिकांना मारण्यास सुरूवात करेल.

Comments
Add Comment

पाकिस्तानमध्ये शाळेचे छत कोसळून भीषण दुर्घटना, 20 विद्यार्थ्यांसह 21 जणांचा मृत्यू

पेशावर : पाकिस्तानमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पेशावरमधील दिर कॉलनी परिसरात एका खासगी शाळेचे छत

Crime News: अमेरिकेत हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबाराचा कट उधळला; 19 वर्षीय तरुणाला अटक

अमेरिका : अमेरिकेतील शिकागो परिसरात हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबार करण्याचा कथित कट उधळण्यात आला आहे. या

इस्रायलचे नवे कठोर नियम, 31 देशांतील क्रू सदस्यांच्या प्रवेशावर निर्बंध; एअर फ्रान्सकडून पालनाला दुजोरा

तेलअवीव : फ्लाय दुबईच्या विमानाशी संबंधित अपहरणाच्या प्रयत्नानंतर इस्रायलने परदेशी विमान कंपन्यांसाठी

Germany Robot Viral Video : रोबोटकडून १६ वर्षांच्या तरुणीचा लैंगिक छळ; जर्मनीत खळबळ, पोलिसांनी रोबोटसह मोबाईल केले जप्त

कोलोन : जर्मनीतील कोलोन शहरात एका रेस्टॉरंटबाहेर १६ वर्षांच्या अल्पवयीन तरुणीचा रोबोटद्वारे अयोग्य स्पर्श आणि

विमान अपहरणाचा प्रयत्न? UAE मध्ये मालदीवचे 2 वैमानिक अटकेत; नेमकं प्रकरण काय?

अबुधाबी : दुबईहून तेल अवीवच्या दिशेने जाणाऱ्या 'फ्लाय दुबई' (Flydubai) विमानावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी एक मोठी आणि

धक्कादायक! फ्रान्समधील सुपरमार्केटच्या शेकडो फ्रिजवर सायबर हल्ला; अन्नाचा साठा गरम झाल्याने लाखो युरोंचे नुकसान

पॅरिस : फ्रान्समधील सुपरमार्केटवर झालेल्या एका अजब आणि भीषण सायबर हल्ल्यामुळे खळबळ उडाली आहे. या हल्ल्यामुळे