Suicide for Maratha reservation : एक मराठा लाख मराठा चळवळीत आणखी एका तरुणाची आत्महत्या!

एकीकडे जरांगेंच्या सभेला रात्री १२ वाजताही गर्दी तर दुसरीकडे तरुण संपवतायत जीवन...


नांदेड : मराठा आरक्षणासाठी (Maratha reservation) राज्यभरात सुरु असलेल्या आंदोलनाचे दिवसेंदिवस तीव्र प्रतिसाद उमटत आहेत. आंदोलनकर्त्यांचे पुढारी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या नेतृत्वावर मराठ्यांचा विश्वास वाढत चालला असून बीडमध्ये रात्री १२ वाजता झालेल्या सभेलाही मराठे मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र, दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी तरुण आपलं जीवन संपवत आहेत. मुंबईत एका ४५ वर्षीय सुनील कावळेंनी गळफास लावून आत्महत्या केली तर बीडमध्येही जगन्नाथ काळकुटे नामक एका युवकाने आत्महत्या केली. या धक्कादायक घटनांनंतर आता नांदेडमधूनही मराठा आरक्षणासाठी एका तरुणाने आपलं जीवन संपवल्याची (Suicide Case) बातमी समोर आली आहे. त्यामुळे मराठा आरक्षणासाठी मराठे प्रचंड पेटून उठल्याचे चित्र राज्यभरात पाहायला मिळत आहे.


हदगाव तालुक्यातील वडगाव येथील एका २४ वर्षीय तरुणाने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली. शुभम सदाशिव पवार असे मृत तरुणाचे नाव आहे. 'एक मराठा लाख मराठा, मराठा आरक्षण भेटण्यासाठी मी माझ्या जिवाचे बलिदान देत आहे. माझे हे बलिदान वाया जाऊ नये' असा मजकूर लिहिलेली चिठ्ठी त्याच्या जवळ आढळून आली. त्यामुळे मराठा आरक्षण मिळावे याकरता या तरुणाने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे.


अर्धापूर येथील तामसा रोड वरील नरहरी मंगल कार्यालयाच्या बाजूला शुभमचा मृतदेह आढळून आला. घटनास्थळी अर्धापूर पोलिसांनी भेट दिली. शवविच्छेदनासाठी मृतदेह नांदेडच्या शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. याप्रकरणी केशव पवार यांनी दिलेल्या माहितीवरून अर्धापूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली दीपक मस्के करत आहेत.



शुभम अर्धापूरला कसा पोहोचला? नेमकं काय घडलं?


हदगावमध्ये राहणारा शुभम प्लंबरचं काम करता करता शिक्षणही घेत होता. काल शनिवारी सकाळी तो रेल्वेने मुंबई येथून नांदेडला आला. नांदेडच्या नमस्कार चौक परिसरात राहणार्‍या बहिणीला भेटून मग घरी येतो, असे त्याने वडिलांना फोन करुन कळवले. परंतु संध्याकाळी सात वाजले तरी शुभम घरी आला नाही. फोन लावला असता त्याने फोनही उचलला नाही. नातेवाईकांनी त्याची शोधाशोध सुरू केली. तामसा पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली.


त्यावेळी पोलिसांनी शुभमचे मोबाईल लोकेशन चेक केले असता अर्धापूर परिसरात मोबाईल लोकेशन आढळून आले. शोध घेतला असता शुभम हा अर्धापूर येथील तामसा रोड वरील नरहरी मंगल कार्यालयाच्या बाजूला झाडीमध्ये आढळून आला. त्याच्या जवळ विषारी औषधाचा डब्बा, पावती व चिठ्ठी आढळली. ज्या चिठ्ठीमध्ये 'एक मराठा लाख मराठा' , मराठा आरक्षण भेटण्यासाठी मी माझ्या जिवाचे बलिदान देत आहे, माझे हे बलिदान वाया जावू नये. मी शुभम सदाशिव पवार', असा मजकूर आढळून आला.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा