नाशिकच्या सकल मराठा समाजाच्या आवाहनाने मंत्री मुनगंटीवार यांचा दौरा अखेर रद्द

सार्वजनिक वाचनालयाने काढले पत्रक


नाशिक (प्रतिनिधी) - नाशिक सार्वजनिक वाचनालयाच्या मंगळवार ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी होणारा नियोजित कार्यक्षम आमदार पुरस्कारासाठी येणाऱ्या मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा नियोजित कार्यक्रम सकल मराठा समाजाचे मराठा उपोषणकर्ते नाना बच्छाव व सहकाऱ्यांनी आवाहन केल्याने पुढे ढकलला आहे,असे सार्वजनिक वाचनालयाने काढलेल्या पत्राद्वारे कळवण्यात आले आहे.


आज सोशल मीडियावर सार्वजनिक वाचनालयाचे पत्रकावर सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यास कार्यक्षम पुरस्काराने मंगळवारी गौरवणार असा मेसेज होता,हा मेसेज बघताच नाशिकला गेल्या ४५ दिवसापासून अखंडित उपोषणात बसलेले उपोषणकर्ते नाना बच्छाव व सहकाऱ्यांनी बघितला व सार्वजनिक वाचनालयाचे संचालक संजय करंजकर,सोमनाथ मुठाळ यांना फोन करून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण लढ्यात कोट्यवधी गावानी सहभाग घेतला असून गाव खेड्यात शहरात मंत्री नेत्यांना बंदी असतांना आपण मंत्र्याला का बोलवले असा सवाल केला,मराठा समाजाच्या उद्विग्न भावना बघता आपण मंत्र्याला थांबवा असा इशारा दिला होता त्यांचा शब्द पाळत नाशिक सार्वजनिक वाचनालयाचे सचिव डॉ धर्माजी बोडके यांच्या स्वाक्षरीने पत्रक काढून संबंधित कार्यक्रम पुढे ढकलला असे पत्रक सकल मराठा समाज उपोषण कर्त्याना कळवले आहे.

Comments
Add Comment

Nanded Accident : सहस्त्रकुंड धबधबा पाहून परतताना काळाचा घाला; जीप झाडावर आदळली, 3 भाविकांचा मृत्यू

नांदेड : सहस्त्रकुंड धबधबा आणि महादेव मंदिराचे दर्शन घेऊन तेलंगणाकडे परतणाऱ्या भाविकांच्या जीपचा नांदेड

Pune Rain Alert : पुणेकरांनो, छत्री तयार ठेवा! पावसाचं पुन्हा आगमन; हवामान विभागाचा महत्त्वाचा अंदाज

पुणे : गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने पुणे शहरात उकाडा आणि दमटपणात वाढ झाली आहे. ढगाळ

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.