Maratha reservation: सातपूरला आरक्षण आणि पाठिंब्यासाठी कॅडल मार्च

सातपूर (प्रतिनिधी) - मराठा आरक्षण तातडीने द्यावे, या मागणीसह जरांगे- पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शविण्यासाठी सातपूर विभागातून सकल मराठा समाजातर्फे मंगळवारी सायंकाळी मेणबत्ती फेरी काढण्यात आली. यावेळी परिसरातील महिला पुरुषांसह सर्वपक्षीय राजकीय व सर्व धर्मीय बांधव यांनी हजेरी लावली होती.


सायंकाळी सातच्या सुमारास सावरकरनगर येथील जाणता राजा मैदान पासून सुरु झालेली रॅली मौले हॉल, आनंद छाया, सातपूर कॉलनी,समता नगर, सातपूर राजवाडा मार्गे सातपूर गाव छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे समारोप करण्यात आला.


यावेळी मराठा आरक्षणाला विरोध करणारे ॲड. गुणरत्न सदावर्ते यांचाही निषेध करण्यात आला. मेणबत्या पेटवून सातपूर येथील शिवरायांच्या पुतळ्याजवळ लावण्यात आल्या. यावेळी हजारो मराठा समाजबांधव उपस्थित होते.



उद्यापासून साखळी उपोcaषण


दरम्यान ,बुधवारी सकाळपासून साखळी उपोषणास सुरुवात करण्यात येणार असून समाज बांधवानी सहभागी व्हावे असे आवाहन सकल मराठा समाजातर्फे करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Maharashtra Weather Update : सप्टेंबरच्या सुरुवातीलाच हवामान बदलणार; विदर्भात जोरदार पावसाची शक्यता

मुंबई : महाराष्ट्रात ऑगस्ट महिन्यात पावसाने काहीशी ओढ दिल्यानंतर सप्टेंबरच्या सुरुवातीला हवामानात बदल

Jalgaon : काल वाढदिवस...आज काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश, चिमुकल्याला झोळीत गळफास

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे अत्यंत धक्कादायक अन् हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पहिल्या वाढदिवस ,

Medha Kulkarani : धार्मिक उत्सवात अशा कार्यक्रमांची गरज काय...; गणेशोत्सवात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमावरून वाद

पुणे : महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आणि श्रद्धेने साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाला राज्यभरात सुरुवात झाली आहे.

Nanded Accident : सहस्त्रकुंड धबधबा पाहून परतताना काळाचा घाला; जीप झाडावर आदळली, 3 भाविकांचा मृत्यू

नांदेड : सहस्त्रकुंड धबधबा आणि महादेव मंदिराचे दर्शन घेऊन तेलंगणाकडे परतणाऱ्या भाविकांच्या जीपचा नांदेड

Pune Rain Alert : पुणेकरांनो, छत्री तयार ठेवा! पावसाचं पुन्हा आगमन; हवामान विभागाचा महत्त्वाचा अंदाज

पुणे : गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने पुणे शहरात उकाडा आणि दमटपणात वाढ झाली आहे. ढगाळ

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला