डहाणूत ग्रामपंचायत निवडणूकीत संमिश्र प्रतिसाद

चिंचणी ग्रामपंचायतीवर पहिल्यांदाच भाजपचे वर्चस्व


डहाणू : डहाणू तालुक्यात १७ ग्रामपंचायतींसाठी रविवारी थेट सरपंचपदासाठी आणि १९७ सदस्यपदासाठी सोमवार, दि. ६ नोव्हेंबर रोजी झालेल्या मतमोजणीत गटागटात विखुरल्या गेलेल्या राजकीय पक्षांना संमिश्र प्रतिसाद मिळाला असला तरी, सर्वांत मोठ्या असलेल्या चिंचणी ग्रामपंचायतीवर भाजपने पहिल्यांदाच आपला झेंडा फडकविण्यात यश मिळविले आहे. या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाला एकही जागा मिळविता आलेली नाही, तर भाजपने मिळविल्या यशाचे श्रेय जिल्हाध्यक्ष भरतसिंग राजपूत यांना देण्यात येत असून, त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.


सोमवारी झालेल्या १७ ग्रामपंचायत मतमोजणीप्रमाणे विविध राजकीय पक्षांनी दावा केल्याप्रमाणे पक्षीय बलाबल असे आहे, भाजप ४, माकप ४, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट ३, मनसे १, उबाठा ४, अपक्ष व गाव पॅनल १.


थेट सरपंचपदी निवडून आलेले उमेदवार राजकीय पक्षाने दावा केल्याप्रमाणे ग्रामपंचायतीनुसार


सावटा - महाद्या बेंदर (भाजप), चिंचणी - मेघा शिंगडे (भाजप), दाभोण - हर्षला दळवी (भाजप), जांबुगाव - प्रेमा करबट (भाजप);


किन्हवली - शेलु दुमाडा (माकप), दाभाडी - पार्वती पिलेना (माकप), मोडगाव - रंजना चौधरी (माकप), सोगवे - लहानी दौडा (माकप);


आंबेसरी - गीता मोरघा (उबाठा), चारोटी - तेजस्वी कडू (उबाठा), गोवणे - अलका घोडा (उबाठा), वंकास - रुबीना तांडेल (उबाठा),


दापचारी - भारती भीमराव (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट), गांगणगाव - सविता पालकर (राकाँप शरद पवार गट),


राई - नवशा धोडी (मनसे),


बोर्डी - श्याम दुबळा(परिवर्तन पॅनल),


कापसी - कलावती रावते (अपक्ष) असे सरपंचपदी विराजमान झाले आहेत.

Comments
Add Comment

मुंबईत लाडक्या गणरायाची तयारी अंतिम टप्प्यात, विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी घेतला तयारीचा आढावा

मुंबई: लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवसच शिल्लक असताना आता महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सवाची लगबग अंतिम

Pune MPSC Student Suicide: पुण्यात स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या, सुसाईड नोटमधलं कारण वाचून सर्वच हादरले...

पुणे: विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका तरुणाने जीवन संपवल्याची

गणेशोत्सवात होणार भक्तांची मोफत आरोग्य तपासणी? कुठे मिळणार फायदा

मुंबई: गणेशोत्सवाच्या काळामध्ये महाराष्ट्र सरकारकडून भक्तांच्या आरोग्याची काळजी घेत 'मुख्यमंत्री सहाय्यता

Ganeshotsav 2026: Mira Bhayandar गणेशमूर्ती विसर्जनासाठी सज्ज, २४ ठिकाणी तलावांचा समावेश; वाचा यादी

मीरा भाईंदर: मीरा भाईंदर महानगर पालिकेकडून गणेशोत्सवाच्या आधीपासूनच गणेशमूर्ती विसर्जनाच्या उपाययोजना

Nashik News : येवल्यात 760 कोटींचा मेगा प्रोजेक्ट ! 4 हजार रोजगारांची संधी

Nashik News : नाशिकच्या येवल्यात आता उद्योगविश्वासाठी मोठी बातमी आहे. कारण येवल्यात तब्बल ७६० कोटी रुपयांचा कृषी-आधारित

Vandana Gupte News: वंदना गुप्ते प्रशासनावर संतापल्या; म्हणाल्या, 'खर्च झेपत नसेल, तर माझ्या पैशांनी...'

मुंबई: प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्री वंदना गुप्ते ह्यांनी आपल्या दमदार अभिनयाच्या माध्यमातून चहात्यांच्या