गणेशोत्सवात होणार भक्तांची मोफत आरोग्य तपासणी? कुठे मिळणार फायदा

मुंबई: गणेशोत्सवाच्या काळामध्ये महाराष्ट्र सरकारकडून भक्तांच्या आरोग्याची काळजी घेत 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष'च्या पुढाकाराने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. महाराष्ट्र सरकारकडून राज्यभरात तब्बल २० हजार मोफत आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. सार्वजनिक गणेश मंडळांच्या मंडपांपासून महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत तसेच ग्रामीण भागापर्यंत अशा प्रत्येक ठिकाणी ही सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. (Maharashtra News)



‘श्रीगणेशा आरोग्याचा’ असं या उपक्रमाचे नाव असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू झाला आहे. उपक्रमाचे यंदाचे दुसरे वर्ष आहे. 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष'च्या पुढाकाराने सार्वजनिक आरोग्य विभागाकडून तब्बल १० हजार सार्वजनिक गणेश मंडळे, शासकीय- निमशासकीय यंत्रणा, सामाजिक संस्थेच्या सहभागातून हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये उपक्रम राबवण्यात येणार असून शहरापासून ते गाव- खेड्यापाड्यापर्यंत प्रत्येक कानाकोपऱ्यातील नागरिकांना ह्या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. नागरिकांना त्यांच्या परिसरातच मोफत आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

डॉक्टर आपल्या दारी


‘श्रीगणेशा आरोग्याचा’ या उपक्रमात नागरिकांना त्यांच्या परिसरात आरोग्य तपासणीची सुविधा मिळावी आणि आजारांचे वेळेत निदान व्हावे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. तपासणी दरम्यान आरोग्यविषयक समस्या आढळल्यास संबंधितांना पुढील तपासणी व उपचारासाठी संदर्भात करण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, जिल्हा रुग्णालये, शहरी आरोग्य आयुक्तालय, स्थानिक स्वराज्य संस्थांची आरोग्य यंत्रणा तसेच धर्मादाय रुग्णालयांतील डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांची मदत घेण्यात येणार आहे. (Public Health)



तपासणीनंतर पुढील उपचारांची आवश्यकता असलेल्या पात्र रुग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजना तसेच इतर संबंधित शासकीय योजनांच्या माध्यमातून उपचाराचा लाभ मिळवून देण्यात येणार आहे. गेल्या वर्षी १२ हजार ६५५ आरोग्य शिबिरांमध्ये ७ लाख ४ हजार ७३ नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी १८ हजार ८०० रुग्णांना पुढील उपचारासाठी दुसऱ्या डॉक्टरांच्या उपचाराचा सल्ला देण्यात आला होता. २३६ रक्तदान शिबिरांत १६ हजार ७९८ नागरिकांनी रक्तदान केले होते. गेल्या वर्षीचा प्रतिसाद पाहता यावर्षी उपक्रमाची व्याप्ती वाढवली आहे. (CM Devendra Fadanvis)

'या' आजारांचा असणार समावेश


हृदयरोग, किडनी विकार, कर्करोग, मधुमेह, संसर्गजन्य आजार, मेंदूचे गंभीर आजार, बालरोग यांसह विविध आजारांची प्राथमिक तपासणी करण्यात येणार आहे. गरजेनुसार पुढील तपासणी आणि उपचारासाठी रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टर तसेच संबंधित रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रम यंदा अधिक व्यापक स्वरूपात राबविण्यात येत आहे. नागरिकांना त्यांच्या परिसरातच मोफत आरोग्य तपासणीची सुविधा मिळणार आहे.



आजारांचे वेळेत निदान होऊन गरज असलेल्या रुग्णांना पुढील उपचारासाठी योग्य ठिकाणी संदर्भित करण्यात येणार आहे. यंदा २० लाखांहून अधिक नागरिकांच्या आरोग्य तपासणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. नागरिकांनी या उपक्रमाचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी केले आहे. (Health News)
Comments
Add Comment

Pune MPSC Student Suicide: पुण्यात स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या, सुसाईड नोटमधलं कारण वाचून सर्वच हादरले...

पुणे: विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका तरुणाने जीवन संपवल्याची

Justice Mahesh Chandra Tripathi : न्या. महेश चंद्र त्रिपाठी यांनी घेतली मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ

मुंबई : राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी बुधवारी लोकभवन येथे झालेल्या छोटेखानी शपथविधी समारंभात अलाहाबाद उच्च

Minister Gulabrao Patil : 'डीजेच्या आवाजाने एका कानाने ४०% ऐकू येईना !’ गुलाबराव पाटलांची आपबिती; गणेशोत्सवाआधी तरुणांना आवाहन

Minister Gulabrao Patil : डीजेचा दणदणाट हा काहींसाठी उत्सवाचा जल्लोष असतो पण याच आवाजाचा त्रास किती गंभीर असू शकतो, याची आपबिती

Devendra Fadnavis : यंदाचा ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून, संभाव्य साखर टंचाई रोखण्यासाठी निर्णय; मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील मंत्री समितीच्या बैठकीत निर्णय

मुंबई : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर संभाव्य साखर टंचाई रोखण्यासाठी यंदाचा गाळप हंगाम लवकर सुरू करण्याबाबत

Ban on Dolby sound systems : धुळ्यात गणेश मंडळांना मोठा धक्का ! डॉल्बी आणि लेझर लाईटवर थेट बंदी, उल्लंघन केल्यास गुन्हा

Ban on Dolby sound systems : गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवाची तयारी सुरू असतानाच धुळे जिल्हा पोलिसांनी मोठा आणि महत्त्वाचा निर्णय

Jalgaon Accident News : जळगावात भरधाव कंटेनर पलटी, तरुणाचा जागीच मृत्यू

Jalgaon Accident News : पाळधी ते तरसोद बायपासवर भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनरचा अचानक ताबा सुटला आणि काही क्षणांतच कंटेनर