Sridevi Biopic : सिनेमा आल्यास श्रीदेवीच्या मृत्यूचे रहस्य उलगडेल अशी बोनी कपूरला भीती!

'कधीच येणार नाही जीवनपट!' असं का म्हणाले बोनी कपूर?


मुंबई : बॉलिवूडची (Bollywood) हवाहवाई आणि पहिली महिला सुपरस्टार असलेली श्रीदेवी (Sridevi) आजही चाहत्यांच्या मनात घर करुन आहे. २४ फेब्रुवारी २०१८ रोजी तिचं निधन झालं. मात्र त्यानंतरही तिचे सुपरहिट सिनेमे प्रेक्षक आवडीने पाहतात, तिची गाणी चाहते कायम गुणगुणत असतात. याच श्रीदेवीच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी तिच्या आयुष्यावर आधारलेला एक जीवनपट (Biopic) यावा अशी चाहत्यांची प्रचंड इच्छा होती. परंतु श्रीदेवीचे पती बोनी कपूर (Boney Kapoor) यांनी यावर स्पष्ट शब्दांत केलेल्या भाष्याने चाहते काहीसे निराश झाले आहेत.


श्रीदेवीचा मृत्यू हा रहस्यमय पद्धतीने झाला होता, असं तिच्या अनेक चाहत्यांना वाटतं. त्यामुळे तिच्या बालपणापासून ते अभिनेत्री होण्यापर्यंतचा प्रवास आणि नंतर अचानक आलेला मृत्यू हे सर्व चित्रपटरुपी समोर यावं अशी चाहत्यांची इच्छा होती. यावर चित्रपट येणार अशी चर्चाही रंगली होती. मात्र, बोनी कपूर यांनी श्रीदेवीच्या जीवनपटासाठी स्पष्ट नकार दिला आहे.


बोनी कपूर नुकत्याच एका मुलाखतीत म्हणाले, "श्रीच्या आयुष्यावर मी कधीही सिनेमा बनवणार नाही. श्रीदेवीच्या बायोपिकसाठी मला अनेकांनी विचारलं आहे. पण आयुष्यात कधीच मी श्रीच्या आयुष्यावर सिनेमा बनवणार नाही. श्रीदेवीवर सिनेमा बनवणं हा माझा वैयक्तिक विषय आहे. श्रीदेवीच्या आयुष्यावर किंवा तिच्याबद्दल काही जण पुस्तक लिहित आहेत. तिच्या आयुष्यावर एखादं पुस्तक लिहिण्याची देखील माझी इच्छा नाही".


बोनी आणि श्रीदेवी यांनी १९९६ साली लग्न केले होते. मात्र, त्यांच्या लव्हस्टोरीबद्दल लोकांना अजून फारशी माहिती नाही. यावर बोनी कपूर म्हणाले,"श्रीदेवी आणि माझी लव्हस्टोरी ही आमची वैयक्तिक बाब आहे. श्री ही कायमच माझ्या जवळ असणार आहे. आम्ही कसे एकमेकांच्या प्रेमात पडलो आणि संसार थाटला ही आमची वैयक्तिक बाब आहे. यावर एखादी कलाकृती होऊ नये". बोनी कपूर यांच्या या वक्तव्यामुळे चाहते नाराज झाले आहेत.


विशेष म्हणजे, श्रीदेवी दुबईमध्ये ज्या हॉटेलमध्ये थांबली होती त्या हॉटेलच्या बाथटबमध्ये मृतावस्थेत आढळून आली होती. ती बुडल्याचे कोणाच्याच लक्षात आले नव्हते. तिच्या मृत्यूचे नेमके कारण हे अजूनही एक गूढ आहे. जर श्रीदेवीच्या जीवनावर सिनेमा किंवा पुस्तक आलं तर त्यात तिच्या मृत्यूवरही भाष्य केलं जाईल अशी भीती बोनी कपूर यांना वाटत असावी आणि त्यामुळेच ते वैयक्तिक बाब सांगून चरित्रपटास नकार देत असतील, अशी चर्चा बॉलिवूडमध्ये आहे.

Comments
Add Comment

Maharashtra Sadan Delhi : दिल्लीतील महाराष्ट्र सदनात गणेशोत्सवाची दिमाखात सांगता; भव्य मिरवणुकीने गणरायाला निरोप

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील कोपर्निकस मार्गावरील महाराष्ट्र सदनात 14 सप्टेंबरपासून सुरू असलेल्या सार्वजनिक

Central Railway : सणासुदीच्या गर्दीसाठी मध्य रेल्वे सज्ज; 418 विशेष गाड्यांची घोषणा

मुंबई : आगामी पूजा, दिवाळी आणि छठ उत्सवाच्या काळात रेल्वे प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य

Noida Bus Fire : ‘आई खाली उतरेपर्यंत मी बाहेर पडणार नाही’, शशांकने अखेरपर्यंत सोडली नाही आईची साथ; नोएडा बस दुर्घटनेतील शशांकची हृदयद्रावक कहाणी

Noida Bus Fire : यमुना एक्सप्रेसवेवर जेवरजवळ बुधवारी रात्री खासगी एसी स्लीपर बसला भीषण आग लागून 9 प्रवाशांचा मृत्यू झाला.

वृंदावनमध्ये प्रेमानंद महाराजांच्या शिष्याचा संशयास्पद मृत्यू, चार मजली इमारतीवरून उडी ; आश्रमात खळबळ

वृंदावन (उत्तर प्रदेश) : मथुरेतील प्रसिद्ध प्रेमानंद महाराज यांचे शिष्य दीपक कुमार उर्फ ‘रसिक दुलारी सरन’ यांचा

भारताला स्थायी सदस्यत्व मिळणार? पोर्तुगालने UNSC मध्ये सुचवले महत्त्वाचे बदल

नवी दिल्ली: संयुक्त राष्ट्र महासभेमध्ये भारताच्या सदस्यत्वाला पोर्तुगालकडून विशेष समर्थन मिळाले आहे.

घर बदलताना गॅस कनेक्शनची चिंता सोडा; 'या' सोप्या पद्धतीने नवीन शहरात ट्रान्सफर करा सिलिंडर!

आयुष्याच्या चढउतारात आपल्याला अनेकदा एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्याची वेळ येते. नोकरी, शिक्षण या निमित्ताने