वसई- विरार: वसई- विरार महानगर पालिका क्षेत्रातील नागरिकांच्या दृष्टीने एक महत्त्वाची बातमी आहे. 'महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने'अंतर्गत दाखल ...
लुईस मॉन्टेनेग्रो यांनी सुरक्षा परिषद अधिक मजबूत करण्यासाठी आफ्रिका, ब्राझील आणि भारताला स्थायी सदस्यत्व देण्याचे समर्थन केले. लुईस मॉन्टेनेग्रो यांच्या मते, आणखीन राष्ट्रांना सदस्यत्व दिल्यामुळे बदलत्या जागतिक परिस्थितीनुसार सुरक्षा परिषद अधिक सक्षम आणि प्रतिनिधित्व करणारी बनेल. या निर्णयामुळे सुरक्षा परिषद अधिक प्रभावीपणे आणि वेगाने काम करू शकेल, असेही पोर्तुगालच्या पंतप्रधानांनी सांगितले.
मुंबई: अफगाण नागरिकांना बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतीय पासपोर्ट मिळवून देणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. मुंबई, छत्रपती शिवाजी महाराज ...
संयुक्त राष्ट्रांच्या सदस्य देशांनी संघटनेच्या आर्थिक गरजा आणि शांतता मोहिमांसाठी आपली जबाबदारी पूर्ण करायला हवी, असेही त्यांनी नमूद केले. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत एकूण 15 सदस्य असतात. त्यापैकी 5 स्थायी सदस्य आहेत. ज्यामध्ये अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स आणि ब्रिटन या पाच राष्ट्रांचा समावेश आहे. या पाचही देशांकडे व्हेटोचा अधिकार आहे. याशिवाय 10 अस्थायी सदस्य असतात, ज्यांची दोन वर्षांच्या कार्यकाळासाठी निवड केली जाते.
मुंबई : शुक्रवार, 25 सप्टेंबर रोजी मुंबईतील गजबजलेल्या भुलेश्वर परिसरामध्ये एका व्यावसायिक-निवासी इमारतीला लेव्हल-1 ची आग लागल्याची दुर्घटना घडली. ...
भारत सध्या सुरक्षा परिषदेचा स्थायी सदस्य नाही. भारत दीर्घकाळापासून सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्यत्व आणि व्यापक सुधारणांची मागणी करत आहे. भारत, ब्राझील, जर्मनी आणि जपान हे चार देश ‘जी-४’ (G4) गटाच्या माध्यमातूनही सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्यत्वासाठी समर्थन मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. भारताला सुरक्षा परिषदेत स्थायी जागा देण्याची मागणी पोर्तुगालकडून यापूर्वीही करण्यात आली आहे. पोर्तुगालचे तत्कालीन पंतप्रधान अँटोनियो कोस्टा यांनी २०२२ मध्येही सुरक्षा परिषदेत आफ्रिका खंडासोबत किमान ब्राझील आणि भारताला स्थायी सदस्यत्व मिळायला हवे, असे म्हटले होते.