घर बदलताना गॅस कनेक्शनची चिंता सोडा; 'या' सोप्या पद्धतीने नवीन शहरात ट्रान्सफर करा सिलिंडर!

आयुष्याच्या चढउतारात आपल्याला अनेकदा एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्याची वेळ येते. नोकरी, शिक्षण या निमित्ताने शहर बदलावं लागतं. एका शहरातून दुसऱ्या शहरात गेल्यानंतर तिथल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी काही काळ जातो. इतकंच काय तर घर बदलल्यानंतर वीज, पाणी आणि गॅस या सारख्या सुविधांची तजवीज पहिल्यांदा करावी लागते. कारण त्या शिवाय दैनंदिन आयुष्य जगणं कठीण आहे. नव्या घरात गेल्यानंतर वीज आणि पाण्याची सुविधा सहज उपलब्ध असते. पण गॅस कनेक्शन बाबत चिंता असते. इतकंच काय तर जुन्या कनेक्शनचं काय होणार? हा देखील प्रश्न असतो. तुम्हालाही असाच प्रश्न पडला असेल तर त्याचं उत्तर तुम्हाला येथे मिळेल. तुम्ही शहर बदलल्यानंतरही एलपीजीचं जुनं कनेक्शन नव्या पत्त्यावर आरामात ट्रान्सफर करू शकतो. यासाठी एक सोपी प्रक्रिया आहे. चला जाणून घेऊयात सोप्या शब्दात...

शहर बदलल्यानंतर कसं ट्रान्सफर कराल एलपीजी कनेक्शन?


जर तुम्ही एका शहरातून दुसऱ्या शहरात शिफ्ट होणार असाल तर सर्वप्रथम तुमच्या सध्याच्या गॅस एजन्सीशी संपर्क साधा. तुमच्या एजन्सीकडे गॅस सिलिंडर आणि रेग्युलेटर जमा करा. इतकंच काय तर सब्सक्रिप्शन वाउचर, डोमेस्टिक गॅस कन्झ्युमर कार्ड आणि इतर आवश्यक कागदपत्र जमा करा. यानंतर गॅस एजन्सी तुम्हाला टर्मिनेशन वाउचर देईल. इतकंच काय तर या गॅस एजन्सीकडे जमा केलेली सिक्युरिटी रक्कमही तुम्हाला परत दिली जाईल. आता ही प्रक्रिया पार पडल्यानंतर नव्या शहरातील गॅस एजन्सीशी संपर्क साधावा लागेल.


नव्या शहरात एलपीजी कनेक्शन कसं मिळेल?


नव्या शहरात स्थलांतरीत झाल्यानंतर सर्वात आधी जवळच्या एलपीजी गॅस एजन्सीसोबत संपर्क साधा. नव्या गॅस एजन्सीकडे जुन्या गॅस एजन्सीकडून मिळालेलं टर्मिनेशन वाउचर आणि घराच्या पत्त्याशी निगडीत कागदपत्र जमा करा. कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर तुम्हाला नव्या गॅस एजन्सीकडून नवं कनेक्शन, सिलिंडर आणि रेग्युलेटर दिलं जाईल. पण या प्रक्रियेदरम्यान नव्या गॅस एजन्सीकडे कनेक्शनसाठी पुन्हा सिक्युरिटी रक्कम जमा करावी लागू शकते.

एलपीजी कनेक्शन ट्रान्सफर करताना या गोष्टी लक्षात ठेवा


जुन्या गॅस एजन्सीकडून मिळाले टर्मिनेशन वाउचर सांभाळून ठेवा. तसेच इतर कागदपत्र जवळ ठेवा. नव्या शहरात कनेक्शनची प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत ही कागदपत्र व्यवस्थित ठेवा. जर काही कागदपत्रे गहाळ झाली तर नव्या गॅस एजन्सीकडे व्हेरिफिकेशनसाठी अडचण येऊ शकते.
Comments
Add Comment

Sikkim Landslide : सिक्कीममध्ये मुसळधार पावसाचा कहर; रिम्बी गावात भूस्खलन, 128 जणांना सुरक्षित स्थळी हलवले

सिक्कीम : सिक्कीममध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये परिस्थिती

कोल्ड ड्रिंक्सच्या बाटल्यांना खाली पंचकोनी का असतात? पाण्याच्या बाटलीपेक्षा वेगळी रचना असण्याचं कारण काय?

आपण सर्वजण थंड पेय किंवा पाण्याची बाटली विकत घेतो. तुम्ही कधी निरीक्षण केलं आहे का? कोल्ड ड्रिंक्स आणि पाण्याच्या

Karnatak High Court Decision : पतीची प्रेयसी 'नातेवाईक' ठरू शकत नाही; उच्च न्यायालयाकडून महिला प्रेयसीविरोधातील गुन्हा रद्द!

कर्नाटक उच्च न्यायालयाचा मोठा निकाल! बेंगळुरू : पतीच्या प्रेयसीकडून पत्नीचा मानसिक किंवा शारीरिक छळ झाला, तरी

FSSAI New Rules : शाळांजवळ जंक फूडच्या विक्रीवर कडक नियम, FSSAIचा नवा मसुदा; जाणून घ्या काय बदलणार

शाळांमध्ये आणि शाळांच्या 50 मीटर परिसरात जास्त मीठ, साखर आणि फॅट असलेल्या खाद्यपदार्थांच्या विक्रीवर निर्बंध

ग्रेटर नोएडा बस अपघात : "मरायचंय तर मरा, गाडी थांबणार नाही!" - वास येऊनही चालकाचा उद्धटपणा; आगीत ९ प्रवाशांचा होरपळून मृत्यू

ग्रेटर नोएडा : दिल्लीहून उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) महोबाकडे जाणाऱ्या एका खाजगी ट्रॅव्हल्सच्या बसला यमुना

Samastipur Crime News : पुन्हा एकदा 'जमुई कांड'! अल्पवयीन मुलीचा भरदिवसा छळ, व्हिडिओ व्हायरल होताच 4 आरोपी अटकेत

बिहार : बिहारमधील जमुई कांड ताजं असतानाच पुन्हा एकदा असाच प्रकार समोर आला आहे. भरदिवसा एका अल्पवयीन मुलीचा छळ