BJP Protest : सावरकरांबद्दल अपशब्द वापरल्याने विधानभवनाच्या पायऱ्यांवर भाजपचं काँग्रेसविरोधात आंदोलन

मात्र निशाण्यावर उद्धव ठाकरे...


नागपूर : नागपूरच्या विधानभवन (Nagpur Vidhanbhavan) परिसरात सत्ताधारी भाजपच्या (BJP Government) आमदारांनी आज अधिवेशन सुरु होण्यापूर्वी काँग्रेसविरोधात (Congress) आंदोलन केलं. काँग्रेसचे नेते प्रियांक खरगे (Priyank Kharge) यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantryaveer Savarkar) यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल हे आंदोलन करण्यात आलं. यावेळेस काँग्रेसविरोधात आंदोलन असलं तरी उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) लक्ष्य करण्यात आलं होतं.


स्वातंत्र्यावीरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसचा निषेध असं म्हणत भाजपकडून जोरदार आंदोलन करण्यात आलं. 'सावरकर का यह अपमान, नहीं सहेगा हिंदुस्थान', 'खरगे हाय हाय', 'सोनिया जिनकी मम्मी है, वह काँग्रेस डमी है' अशा घोषणा देण्यात आल्या. याचसोबत उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधण्यात आला. 'उद्धव ठाकरे जवाब दो' असे बॅनर्स हातात घेऊन भाजपचे आमदार त्यांच्याविरोधात घोषणाबाजी करत होते.


अनेकदा विरोधकच विधानभवनाच्या पायऱ्यांवर विविध मुद्द्यांवरुन सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आंदोलन करत असतात. पण यावेळेस सत्ताधारी भाजपने विरोधकांच्या विरोधात आंदोलन केले. शिवाय सावरकरांबाबतच्या या मुद्द्यावरुन राज्यभरात इतर ठिकाणीही भाजप आणि सत्ताधारी शिवसेनेची आंदोलने सुरु आहेत.


लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष आपली बाजू श्रेष्ठ आहे, हे दाखवण्यासाठी झटत आहे. त्या शर्यतीत भाजप आघाडीवर आहे. त्यामुळे अशी बेताल वक्तव्ये करणाऱ्या काँग्रेसविरोधात आंदोलन करुन भाजपने आपला निषेध नोंदवला. त्याचसोबत इंडिया आघाडीचा घटक पक्ष असलेल्या आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेची मान खाली घालणाऱ्या उबाठालासुद्धा भाजपकडून काँग्रेस नेत्याच्या कृत्याबाबत जबाब विचारण्यात आला.

Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी