Nitesh Rane : काँग्रेस का हाथ दहशतवादियों के साथ

दाऊद इब्राहिम हा काँग्रेसचा जावई


आमदार नितेश राणे यांचा हल्लाबोल


नागपूर : भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी सलीम कुत्ताचा (Salim Kutta) ठाकरे गटाचे (Thackeray Group) आमदार सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांच्यासोबत नाचतानाचा व्हिडीओ शेअर करुन खळबळ उडवून दिली होती. या प्रकरणी काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल (Kailas Gorantyal) यांनी सलीम कुत्ताची १९९८ मध्येच हत्या झाली, असा दावा केला. यावर नितेश राणे यांनी आज विधानसभा परिसरात माध्यमांशी बोलताना भाष्य केले. 'काँग्रेस नेत्यांना दहशतवाद्यांची एवढी माहिती येतेच कुठून?' असा सवाल उपस्थित करत त्यांनी गोरंट्याल यांच्या एसआयटी (SIT) चौकशीची मागणी केली. तसेच मालेगाव येथे हिंदूंच्या संरक्षणासाठी स्वतंत्र पोलीस मुख्यालय उभारण्याची मागणी केली असल्याची माहिती नितेश राणे यांनी दिली.


नितेश राणे म्हणाले, काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांना कसं माहित की सलीम कुत्ता मेलेला आहे? दाऊदच्या लोकांबद्दल या संबंधित आमदाराला काय माहित आहे? १९९३च्या बॉम्बस्फोटनंतर एका समितीचा रिपोर्ट आला होता. काँग्रेसचे नेते आणि दाऊदच्या (Dawood Ibrahim) संबंधित तो रिपोर्ट होता. माझी अशी मागणी आहे की, या संबंधित आमदारांची एसआयटी चौकशी झाली पाहिजे. त्यांना कसं माहित की कुत्ता जीवंत आहे? कारण माझ्या माहितीनुसार पोलीस सलीम कुत्ताची काही दिवसांनी जेलमध्ये चौकशी देखील करायला जाणार आहेत. पण या काँग्रेस आमदाराला काय माहित आहे? त्याला कोणाचे फोन आले? मग उद्या दाऊदशी काँग्रेसच्या नेत्यांच्या संबंधांबाबत आम्ही जे काही ऐकलं होतं, त्याच्यावर यानिमित्ताने शिक्कामोर्तब झालंय का? असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला.


दाऊदच्या साथीदारांनी १९९३ च्या बॉम्बब्लास्टमध्ये २५७ निरपराध मुंबईकरांना मारलं. त्यात काँग्रेसचा मेला की भाजपचा हे कोणीही बघितलं नाही. त्यांनी उडवताना सगळ्यांना समान उडवून टाकलं. मग याच्यात राजकारण आणि वैयक्तिक हिशोब चुकवण्याचे प्रकार कसे होऊ शकतात? म्हणून माझा मुद्दा असा आहे की, यात राजकारण न करता आम्ही जे पार्टीचे फोटो आणि व्हिडीओ दाखवले, जी पार्टी सार्वजनिक पण नाही तर थेट बडगुजरच्या फार्म हाऊसवर बोलवण्यात आली होती. स्वतःच्या घरात पार्टी म्हटल्यावर ज्या लोकांना आमंत्रण दिलं तीच लोकं आली, हेच खरं आहे. म्हणजेच काँग्रेस का हाथ दहशतवादियों के साथ आहे. दाऊद इब्राहिम हा काँग्रेसचा जावई आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध होतंय. मग संबंधित आमदारांनी हेही सांगावं की दाऊद मेला आहे की जीवंत आहे? त्यांच्या घरातल्या घरगड्यांप्रमाणे काँग्रेसचे नेते झाले आहेत, मग त्यांनी सांगावं की त्याच्यावर विषप्रयोग झाला आहे की नाही?, असं नितेश राणे म्हणाले.



दहशतवाद्यांची माहिती येतेच कुठून?


अशा एका दहशतवाद्याबाबत काँग्रेसच्या नेत्यांना एवढी अंतर्गत माहिती कशी, याची खरंतर चौकशी झाली पाहिजे. त्यांना जर इतकंच बोलायचं असेल तर त्यांनी सभागृहात आमच्यासमोर हा विषय मांडावा, इथे येऊन पत्रकारांसमोर नुसतं बोलायचं नाही. मैदानात आल्यानंतर मग आम्ही त्यांना विचारु की त्यांच्याकडे एवढी दहशतवाद्यांची माहिती येतेच कुठून? दाऊदच्या घरी चहा पाजण्यासाठी असतात का हे लोक?, अशी टीका नितेश राणे यांनी केली.



उद्धव ठाकरेंनी मोर्चे काढले नाहीत तर...


मोर्चे काढले नाहीत तर उद्धव ठाकरेचं दिल्लीचं प्रायव्हेट फ्लाईट कसं उडणार? त्यांचे खाण्यापिण्याचे वांदे होतील, गाडीचं पेट्रोल आणि हप्ते कोण भरणार? मुलाला स्वेटर कोण घालणार? आता ३१ डिसेंबर पण येतंय मग पार्टीचे पैसे कोण भरणार? एवढा खर्च त्यांना काढायचा असतो, असं म्हणत नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंच्या धारावी प्रकल्पाविरोधातील मोर्च्याची खिल्ली उडवली.



मालेगावमध्ये पोलीस मुख्यालयाची मागणी


हिंदू धोक्यात आहे म्हणून मालेगावमध्ये आम्ही पोलीस मुख्यालयाची मागणी करत आहोत. तिथे मिनी पाकिस्तान बनवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. तिथे असलेल्या अल्पसंख्यांक समाजाच्या माध्यमातून गुन्हेगारी फार वाढली आहे. त्यामुळे हिंदूला वाचवण्यासाठी आम्ही मैदानात उतरलो आहोत. हे मविआचं सरकार नव्हे, महायुतीचं आणि हिंदुत्ववादी विचारांचं सरकार आहे, त्यामुळे आम्ही हक्काने हिंदूंच्या संरक्षणासाठी पोलीस मुख्यालय मागत आहोत, असं नितेश राणे म्हणाले.


Comments
Add Comment

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी

मसाल्यांमध्ये कृत्रिम रंग आणि भेसळीला बंदी; उत्पादक, विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिकांनाही नियम बंधनकारक

मुंबई : मसाल्यांमधील भेसळ रोखून ग्राहकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने

राज्यातील १०२ आणि १०८ रुग्णवाहिका सेवांचे होणार एकत्रीकरण - वर्ष अखेरीस ४ हजार ५०० नव्या रुग्णवाहिका

मुंबई : राज्यातील आपत्कालीन आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि वेगवान करण्यासाठी १०२ आणि १०८ या रुग्णवाहिका सेवांचे

Pratap Sarnaik : एसटीचा १५ टक्के हंगामी भाडेवाढीचा प्रस्ताव नामंजूर, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना दिलासा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा निर्णय

मुंबई : दुष्काळ आणि महागाईमुळे आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा देण्यासाठी एसटी