INDIA Alliance Meeting : इंडिया आघाडीच्या बैठकीत समोसा नव्हता म्हणून जेडीयू नेता नाराज

नवी दिल्ली : इंडिया आघाडीच्या (INDIA Alliance) बैठकीनंतर समोसा चांगलाच चर्चेत आला आहे. जेडीयू खासदाराने बैठकीत समोसा नसल्याने जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.


इंडिया आघाडीची चौथी बैठक (INDIA Alliance meeting) मंगळवारी दिल्ली येथे पार पडली. या बैठकीत अनेक मुद्द्यांवर थातूरमातूर चर्चा झाली परंतू कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. तर काही मुद्दे चर्चा करून तसेच तडजोडीतून सोडवण्यावर उपस्थित नेत्यांनी केवळ माना डोलावून होकार दिला. मात्र एक जेडीयू नेते माध्यमांशी बोलताना चांगलेच संतापले होते.


जेडीयू खासदार सुनील कुमार पिंटू (Sunil Kumar Pintu) यांनी मंगळवारी झालेली इंडिया आघाडीची बैठक निष्फळ असल्याचे म्हटले आहे. अशा प्रकारे त्यांनी पुन्हा एकदा नितीश कुमार आणि पक्षाविरोधात बंडाची भूमिका घेतली आहे. त्यांनी विरोधी आघाडीच्या बैठकीबाबत म्हटले की, आधी मीटिंगमध्ये समोसा मिळत होता. यावेळी केवळ चहा बिस्किटांवर बैठक संपवली.





पिंटू यांनी सांगितले की, आधीच्या बैठकांमध्ये चहा बिस्किटांसोबत समोसेही असायचे. मात्र आता काँग्रेस म्हणत आहे की, त्यांच्याकडे निधीची कमतरता आहे. पक्षाकडे फंड नाही. लोकांनी देणगी द्यावी, ते १३८ रुपये, १३८० रुपये किंवा १३,८०० रुपये देणगी मागत आहेत. त्यामुळे मंगळवारची मीटिंग केवळ चहा-बिस्किटांवर संपली, या बैठकीत समोसा दिला नाही, असे म्हणत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.


दरम्यान, पुढच्या वर्षी मार्च एप्रिल महिन्यात लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते. याच्या तयारीसाठी सर्व विरोधी पक्ष एकाच छताखाली येण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत चार राज्यात पराभव झाल्यानंतर इंडिया आघाडीने पुन्हा बैठक आयोजित केली होती. १९ डिसेंबर रोजी २८ पक्षांचे प्रतिनिधी बैठकीसाठी उपस्थित होते. मात्र या बैठकीतील चर्चांबरोबरच' समोसा' ही चर्चेत आला आहे.

Comments
Add Comment

प्रेमासाठी काय पण ! 75 वर्षीय रामसुगर 30 वर्षांच्या रानी राजपूतशी बांधणार लग्नगाठ, साखपुड्याचा व्हिडीओ व्हायरल

उत्तर प्रदेश : प्रेमाला वयाचं बंधन नसतं, असं म्हटलं जातं. उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यातील एका अनोख्या

Saurabh Rajput Murder Case : सौरभ राजपूत हत्या प्रकरणात फाशीची शिक्षा; निर्भया प्रकरणातील जल्लाद पवन यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Saurabh Rajput Murder Case: मेरठमधील सौरभ राजपूत हत्या प्रकरणात मुस्कान रस्तोगी आणि साहिल शुक्ला यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात

Supreme Court Verdict : धर्मांतरानंतर आरक्षण मिळणार का? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : धर्मांतर केलेल्या व्यक्तीला पूर्वीच्या धर्मातील सामाजिक मागासलेपणाच्या आधारे आरक्षण किंवा विशेष

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी