रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी ७८ दिवसांच्या वेतनाइतक्या उत्पादकता आधारित बोनसला (PLB) मंजुरी दिली आहे. सणासुदीच्या हंगामापूर्वी प्रत्येक पात्र कर्मचाऱ्याला कमाल १७,९५१ रुपये मिळणार आहेत. सरकारच्या म्हणण्यानुसार, या बोनसवर रेल्वेला अंदाजे २,००९.६१ कोटी रुपये खर्च येईल आणि त्यात ११,४०,७७० राजपत्रित कर्मचाऱ्यांचा समावेश असेल.
हे पेमेंट दरवर्षी दुर्गापूजा आणि दसऱ्याच्या सुट्टयांपूर्वी केले जाते. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कामगिरीची दखल घेणे आणि त्यांना रेल्वे कामकाजाची कार्यक्षमता सुधारण्यासाठी प्रोत्साहित करणे, हा यामागील उद्देश आहे. या बोनसचा फायदा गट 'क' मधील इतर कर्मचाऱ्यांबरोबरच ट्रॅक मेंटेनर्स, लोको पायलट्स, ट्रेन गार्ड, स्टेशन मास्टर्स, सुपरवायजर्स, टेक्निशियन, पॉइंट्समन आणि मंत्रालयीन कर्मचारी यांसारख्या रेल्वेच्या विविध श्रेणींमधील कर्मचाऱ्यांना होईल.
मुंबई : मसाल्यांमधील भेसळ रोखून ग्राहकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मसाल्यांचे उत्पादन, साठवणूक, ...
सरकरने दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेने २०२५-२६ या आर्थिक वर्षात विक्रमी १,६७० दशलक्ष टन माल आणि जवळपास ७.४१ अब्ज प्रवाशांची वाहतूक करून चांगली कामगिरी केली. भारतीय रेल्वेने ऑगस्ट २०२६ मध्ये ६७.२७ कोटी प्रवाशांची वाहतूक केली, जी मागील वर्षीच्या ६४.४३ कोटी प्रवाशांच्या तुलनेत वाढली आहे. उपनगरीय प्रवासी वाहतुकीत ९.०२ टक्क्यांची लक्षणीय वाढ नोंदवली गेली. ऑगस्ट २०२६ मध्ये उपनगरीय सेवांमधून एकूण ३८.०१ कोटी प्रवाशांनी प्रवास केला, तर ऑगस्ट २०२५ मध्ये हा आकडा ३४.८९ कोटी होता.
मंत्रिमंडळाने २४ सप्टेंबर २०२५ रोजी १०,९१,१४६ कर्मचाऱ्यांसाठी १,८६५.६८ कोटी रुपयांच्या त्याच ७८ दिवसांच्या बोनसला मंजुरी दिली. या वर्षीची एकूण रक्कम १४३.९३ कोटी रुपयांनी जास्त असून ही सुमारे ७.७ टक्क्यांची वाढ आहे. यामध्ये सुमारे ४९,६०० अधिक कर्मचाऱ्यांचा समावेश झाला आहे, जी अंदाजे ४.५ टक्क्यांची वाढ आहे.