Akshay Kumar : मला वाटलं होतं मी सुंदर मुलीशी लग्न केलंय, पण...

ट्विंकल खन्नाच्या वाढदिवशी अक्षय कुमारने ही काय पोस्ट केली?


मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी (Bollywood Khiladi) अक्षय कुमार (Akshay Kumar) सोशल मीडियावर (Social media) प्रचंड अ‍ॅक्टिव्ह असतो. आपली पत्नी ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) व मुलांसोबतचे फोटोज तो कायम सोशल मीडियावर शेअर करतो. ट्विंकल खन्नाशी २००१ मध्ये त्याने लग्नगाठ बांधली. बॉलिवूडमधलं हे चाहत्यांच्या आवडीचं एक कपल आहे. पण ट्विंकल खन्नाच्या वाढदिवशी (Twinkle Birthday) अक्षय कुमारने केलेली एक पोस्ट सध्या प्रचंड चर्चेत आली आहे. आज ट्विंकलचा वाढदिवस असून अक्षय तिच्याबद्दल जे म्हणाला, ते पाहून चाहत्यांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत.


अक्षयने आज आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ट्विंकलचा सुंदर सफेद रंगाचा वनपीस परिधान केलेला फोटो दिसतो आणि लिहिलेले दिसते की, 'मला वाटलं होतं मी या मुलीशी लग्न केलंय' (Who I thought i marrried). त्यानंतर 'पण खरंतर मी कोणाशी लग्न केलंय' (Who I Actually married) असं लिहिलेली एक स्क्रीन दिसते आणि ट्विंकल हॉलिवूड कॅरेक्टर हल्कच्या पुतळ्यासमोर उभी असलेली दिसते. ती स्वतःला उद्देशून म्हणते, 'ये है पुतला और यह है असली हल्क' आणि हल्कसारखी ओरडते. ट्विंकलचा हा मजेशीर व्हिडीओ शेअर करत अक्षयने खास अंदाजात तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.





कॅप्शनमध्ये अक्षयने लिहिलं आहे, 'दीर्घायुषी हो माझी हल्क. तुझ्या विनोदबुद्धीने आपलं आयुष्य वाढवल्याबद्दल तुझे खूप आभार. देव तुला आणखी आयुष्य देवो. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा टिना', असं म्हणत अक्षयने आपल्या पत्नीबद्दल प्रेम व्यक्त केलं आहे. चाहत्यांनी कमेंट्स करत ट्विंकलला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर अनेकांनी दोघांची जोडी कायम अशीच राहू देत, अशा भावना व्यक्त केल्या आहेत.

Comments
Add Comment

Saudi Arabia Flight Update : सौदी अरेबियासाठी विमानसेवा रद्द! IndiGo आणि Akasa Air चा मोठा निर्णय; प्रवाशांनी लक्ष द्या

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील वाढत्या तणाव आणि सुरक्षा परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, इंडिगो आणि अकासा एअर या

Weather Alert: हवामानाचा मोठा इशारा! उद्या 16 राज्यांत पावसाचा रेड अलर्ट, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

देश: हवामान विभागाने पुन्हा एकदा 16 राज्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, 17

Palm Jaggery Export : भारताच्या सेंद्रिय पामिरा गुळाची बल्गेरियाला पहिली निर्यात; 1.755 टनांची खेप रवाना

नवी दिल्ली : भारताच्या पारंपरिक आणि पौष्टिक अन्नपदार्थांनी आता जागतिक पातळीवर आपली पाळेमुळे घट्ट करण्यास

Supreme Court Jobs: 10वी- 12वी उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी, सर्वोच्च न्यायालयात बंपर भरती; साठ हजारांहून अधिक असेल पगार

नवी दिल्ली: सुप्रीम कोर्टामध्ये तरूणांना नोकरी करण्याची संधी आहे. वेगवेगळ्या रिक्त पदांसाठी सुप्रीम

75 टक्के स्वदेशी तंत्रज्ञान! INS समर्थक भारतीय नौदलात दाखल, काय आहेत क्षमता?

नवी दिल्ली : भारतीय सागरी सुरक्षेच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलत भारतीय नौदलाच्या ताफ्यात ‘आयएनएस

सायबर सिक्युरिटीमध्ये करिअरची संधी? NISM चे 2 नवीन कोर्स; जाणून घ्या संपूर्ण माहिती

मुंबई : आर्थिक आणि तांत्रिक सुरक्षेला बळ देण्यासाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटीज मार्केट्सने (एनआयएसएम) एक