Mumbai-Nashik Highway Accident : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबई-नाशिक महामार्गावर दोन भीषण अपघात; तीन ठार, सहा जखमी

नाशिक : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबई-नाशिक महामार्गावर अपघातांच्या (Mumbai-Nashik Highway Accident) दोन दुर्दैवी घटना घडल्या. या अपघातांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी (New Year 2024) पहाटे या घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.


पहिली घटना मुंबई-नाशिक महामार्गावरील इगतपुरी बायपास जवळील बोरटेंभे येथे सोमवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास घडली. यात एका मर्सिडीज कारने भाजीपाला घेऊन जाणाऱ्या आयशर टेम्पोला पाठीमागून जोरदार धडक दिली. यात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमींना उपचारासाठी तत्काळ नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.


दुसरी घटना मुंबई-नाशिक महामार्गावरील पाचपाखाडी भागात घडली. सोमवारी सकाळी टाटा सुमो ही गाडी ठाण्याच्या दिशेने वाहतूक करत होती. सकाळी ७ वाजताच्या सुमारास गाडीचे मागील चाक टायर पंक्चर झाल्याने चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. त्यामुळे त्यांची गाडी रस्त्याकडेला विटांनी भरलेल्या एका टेम्पोला धडकली. यामुळे मोटारीच्या पुढील भागाचा चुराडा झाला असून या अपघातात पाच प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.


फय्याज शेख (५१), विकास कुमार (२१), शिवशंकर विक्रम आदित्य (३३), संतोष कुमार (२४) आणि प्रदीप प्रसाद (२४) अशी जखमींची नावे आहेत.


यापैकी तीन जखमींना ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. तर संतोष कुमार आणि विकास कुमार यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना मुंबईतील सायन रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी