Atal Setu : अटल सेतूवर दोन दिवसांतच २६४ वाहनचालकांवर कारवाई!

नेमकं काय झालं?


मुंबई : राज्यातील बहुप्रतिक्षित मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प (Mumbai Trans Harbour link Project) म्हणजेच अटल बिहारी वाजपेयी स्मृती न्हावाशिवा अटल सेतूचे (Atal Setu) शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. शनिवारी १३ जानेवारीला सकाळी आठ वाजल्यापासून सार्वजनिक वाहतुकीसाठी हा पूल खुला करण्यात आला आणि पहिल्या दोन दिवसांतच लाखो मुंबईकरांचा याला प्रतिसाद मिळाला. मात्र, काही वाहनचालकांर पोलिसांनी कारवाई केली आहे.


हल्ली सर्वांनाच प्रत्येक नवा क्षण सोशल मीडियावर शेअर करण्याची सवय झाली आहे. त्यामुळे पहिल्याच वेळी अटल सेतूवरुन प्रवास करतानाचा फोटो काढण्यासाठी तसेच सेल्फी काढण्यासाठी अनेक जणांनी वाहने थांबवून गर्दी केली. याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करण्यास सुरूवात केली असून तब्बल २६४ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे.


शनिवारी मुंबई ते नवी मुंबई दरम्यान बहुतांश प्रवाशांनी हा मार्ग पाहण्यासाठी येथून प्रवास केला. मात्र, अटल सेतूवर विनाकारण वाहने थांबवून सेल्फी काढणाऱ्या २६४ बेशिस्त वाहनचालकांविरोधात वाहतूक पोलिसांनी कारवाई केली असून त्यांच्याकडून हजारो रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्याचबरोबर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना देखील पोलिसांनी चांगलाच दणका दिला.


मोटर वाहन कायदा कलम १२२ व १७७ कायद्या अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. वाहनचालकांकडून प्रत्येकी ५०० रुपये दंड आकारण्यात आला आहे. त्याचबरोबर, 'अटल सेतू'वर विनाकारण वाहने थांबवून वाहनचालकांनी स्वत:चा आणि दुसऱ्यांचा जीव धोक्यात घालू नये, असे आवाहन मुंबई पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Anant Chaturdashi 2026 : अनंत चतुर्दशीसाठी मुंबई सज्ज; BMCच्या नियोजनाचे मंत्री आशिष शेलारांकडून कौतुक

मुंबई : अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेने गणेशमूर्ती विसर्जनासाठी चोख तयारी केली आहे.

Ganpati Visarjan 2026 : 'पुढच्या वर्षी लवकर या'! मुंबईत 11 व्या दिवशी 430 गणेश मूर्तींचे विसर्जन

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 25 सप्टेंबर रोजी गणेशमूर्ती विसर्जनाचा 11वा दिवस पार पडत आहे. दुपारी 1200

Anant Chaturdashi 2026 : अनंत चतुर्दशीला मुंबईत वाहतूक निर्बंध; 22 हजारांहून अधिक पोलीस तैनात

अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल मुंबई : शुक्रवार, 25 सप्टेंबर रोजी अनंत

Nirma University Viral Video : 'जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है'; विद्यार्थ्याच्या वक्तव्यावर प्राध्यापक संतापले, स्टेजवर कॉलर पकडून...

अहमदाबाद : अहमदाबादमधील निरमा विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या स्टँड-अप कॉमेडी शोदरम्यान घडलेल्या एका

Ganesh Visarjan 2026: 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या'; राज्यात विसर्जन मिरवणुकांना सुरुवात

बाप्पाला निरोप देण्यासाठी गुलालाची उधळण, फुलांचा वर्षाव आणि ढोल-ताशांचा कडकडाट यामुळे वातावरण भारावून गेले आहे.

Mumbai News : कोस्टल रोडवर चोरट्यांचा डल्ला! केबल कापल्याने सुरक्षा यंत्रणा विस्कळीत, पालिकेकडून तातडीने उपाययोजना सुरू

मुंबई : मुंबईतील धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्त्यावरील पथदिवे आणि सीसीटीव्ही