Manoj Jarange : मनोज जरांगेंना वाटते आंदोलनाकडे दुर्लक्ष होण्याची भीती

मुंबईतील आंदोलनाआधी ट्रॅप लावला जात असल्याचा जरांगेंचा आरोप


जालना : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange) येत्या २० जानेवारीपासून मुंबईत आंदोलनाची घोषणा केली आहे. या आंदोलनाची जय्यत तयारी सुरू असतानाच आज मनोज जरांगे पाटील (Maratha Reservation) यांनी मुंबईतील आंदोलनाआधी ट्रॅप लावला जात असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. मला शब्दांत अडकवून गुंतवण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे. आमच्या मोर्चात कुणाला तरी घुसवायचे आणि काहीतरी घडवायचे असे प्लॅनिंग सुरू आहे. पण आता गोळ्या घातल्या तरी माघार घेणार नाही.


माझ्यावर ट्रॅप लावण्याचा प्रयत्न केला जातोय. मराठा समाजाच्या जीवावर राजकारण करणारे, मराठा समाजाच्या जीवावर मोठे झालेले ज्यांच्या दुकानदाऱ्या होत्या त्या आता सगळ्या बंद पडल्या आहेत. अशा लोकांना मी आतून खपत नाही. या लोकांना आरक्षणाचा विषय संपू द्यायचाच नव्हता. त्यामुळे आमच्याकडे दुर्लक्ष करून आमच्या आंदोलनाचा काही मंत्र्यांना अपमान करायचा आहे, असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला.


जरांगे पाटील पुढे म्हणाले, याबाबत मला सरकारी अधिकाऱ्यांकडूनच माहिती मिळाली आहे. त्यामुळे आता आम्ही सावध झालो आहोत. आमच्या आंदोलनात कुणी हिंसाचाराचा प्रयत्न करत आहे का, यावर आता आम्ही बारकाईने लक्ष ठेवणार आहोत. काल राज्य सरकारमधील मंत्र्यांची बैठक झाली. काही जणांचा मराठा आरक्षणाला विरोध आहे. तर काही जणांनी आंदोलनाकडे दुर्लक्ष करण्याचाही सल्ला दिल्याची माहिती आम्हाला समजली आहे. या माहितीची खातरजमा करत आहोत. त्यानंतर आरक्षणाला विरोध असणाऱ्या मंत्र्यांचीही नावं आम्हाला कळतील, असे जरांगे पाटील म्हणाले.

Comments
Add Comment

Jalgaon : चाळीसगाव रेल्वे स्थानकाचा होणार कायापालट! पार्सल हब म्हणून विकसित करण्याची रेल्वेची तयारी

चाळीसगाव : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील चाळीसगाव रेल्वे स्थानकाला आता पार्सल हब म्हणून विकसित करण्याची

Dussehra 2026 : यंदा विजयादशमी २० की २१ ऑक्टोबरला ? जाणून घ्या रावण दहनाची योग्य वेळ आणि पूजेचे मुहूर्त!

भारतीय संस्कृतीमध्ये साडेतीन मुहूर्तांपैकी एक अत्यंत पवित्र, आनंदाचा आणि उत्साहाचा सण म्हणजे 'दसरा' किंवा

Cotton Rate : कापसाच्या दरात तेजीचे संकेत ! भाव 10 हजारांचा टप्पा ओलांडणार? शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या

Cotton Rate : राज्यात यंदा कापूस उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एल निनोचा प्रभाव, पावसातील मोठे

Maharashtra Weather Update: मुंबई-ठाण्यात उष्णतेचा इशारा; कोकणासह देशातील अनेक भागांत पावसाची शक्यता

Maharashtra Weather Update: देशातून नैऋत्य मान्सूनने पूर्णपणे माघार घेतली असली, तरी देशातील हवामानातील बदल सुरूच आहेत. बंगालचा

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून