IND vs ENG: दुसऱ्या कसोटीआधी टीम इंडियाला डबल झटका

मुंबई: भारतीय क्रिकेट संघासाठी मोठी बातमी समोर आली आहे. खरंतर, हैदराबादमध्ये पराभवानंतर टीम इंडियाला डबल झटका बसला आहे. विशाखापट्टणम येथे खेळवल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटीतून स्टार ऑलराऊंडर रवींद्र जडेजा आणि मधल्या फळीतील फलंदाज केएल राहुल बाहेर झाला आहे. बीसीसीआयने ही माहिती दिली.


भारत आणि इंग्लंड यांच्यात २ फेब्रुवारीपासून विशाखापट्टणम येथे पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना खेळवला जाणार आहे. या कसोटी सामन्यात ऑलराऊंडर रवींद्र जडेजा आणि मधल्या फळीतील फलंदाज केएल राहुल बाहेर झाले आहे. जडेजाला हैदराबादमध्ये खेळवण्यात आलेल्या पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवशी हॅमस्ट्रिंग दुखापत झाली होती. तर केएल राहुलच्या उजव्या क्वाड्रिसेप्समध्ये दुखत होते. दरम्यान, बीसीसीआयच्या मेडिकल टीम दोन्ही खेळाडूंवर नजर ठेवून आहे.


 


भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीने सरफराज खान, सौरभ कुमार आणि वॉशिंग्टन सुंदरला दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियात सामील करण्यात आले आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीने सरफराज खान, सौरभ कुमार आणि वॉशिंग्टन सुंदरला दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियात सामील करण्यात आले आहे. तर आवेश खान आपल्या रणजी टीम मध्य प्रदेशसोबत राहणार आहे.


इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडिया - रोहित शर्मा(कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जायसवाल, श्रेयस अय्यर, केएस भरत(विकेटकीपर), ध्रुव जरेल(विकेटकीपर), रवींचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह(उपकर्णधार), आवेश खान, रजत पाटीदार, सर्फराज खान, वॉशिंग्टन सुंदर आणि सौरभ कुमार.

Comments
Add Comment

Duleep Trophy Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशीचं शतक अवघ्या ८ धावांनी हुकलं; सचिनचा 'तो' विक्रम मोडण्याची संधी गमावली

नवी दिल्ली : दुलीप ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Sooryavanshi) दमदार फलंदाजी करत सर्वांचे

Lionel Messi : मेस्सीचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा

अर्जेंटिना : अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली

Tiwana Football Club : वांद्र्यातील नेव्हिल डि'सूजा फुटबॉल मैदानावर तिवाना संघाची बाजी

- मुंबई फुटबॉल असोसिएशन फर्स्ट डिव्हिजन २०२६ च्या चषकावर कोरले नाव मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई फुटबॉल

India vs Thailand Women T20 Asia Cup 2026 : भारताचा थायलंडवर ९४ धावांनी दणदणीत विजय; शेफाली वर्माची तुफानी खेळी

दुबई : महिला टी-२० आशिया कप २०२६च्या सलामीच्या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने थायलंडचा ९४ धावांनी पराभव

ENG vs PAK Test Match : लॉर्ड्सवर पाकिस्तानचा ‘काळा दिवस’; १९४ धावांत ऑलआऊट, WTC फायनलच्या शर्यतीतून बाहेर!

लॉर्ड्स : इंग्लंडविरुद्धच्या लॉर्ड्स कसोटीत पाकिस्तानला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. ३८९ धावांच्या

Kagiso Rabada : कागिसो रबाडा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकण्याची शक्यता

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेच्या सुरुवातीपूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे.