Mahesh Manjrekar : महेश मांजरेकरांच्या नव्या चित्रपटात झळकणार श्रेयस तळपदे आणि गौरी इंगवले

काय आहे चित्रपटाचे नाव?


मुंबई : काही दिवसांपूर्वी सौम्य हृदयविकाराचा (Mild heart attack) आल्याने प्रचंड चर्चेत आलेला प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) आता कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे. महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांच्या आगामी सिनेमात तो प्रमुख भूमिका साकारणार आहे. महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘ही अनोखी गाठ’ (Hi Anokhi gath) या चित्रपटाची नुकतीच सोशल मीडियावर घोषणा करण्यात आली आहे. यात श्रेयस तळपदे आणि गौरी इंगवले (Gauri Ingavale) यांच्या प्रमुख भूमिका असून या चित्रपटाची कथा, पटकथा महेश मांजरेकर यांची आहे.


गौरी इंगवलेने याआधीही महेश मांजरेकरांच्या चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या आहेत. तिचा 'पांघरुण' हा चित्रपट गाजला होता. शिवाय तिने 'कुटुंब' चित्रपटात देखील मुख्य भूमिका साकारली होती. यानंतर ती आता ‘ही अनोखी गाठ’ या चित्रपटात झळकणार आहे. ‘ही अनोखी गाठ’ च्या निमित्ताने महेश मांजरेकर आणि श्रेयस तळपदे ही जोडी पहिल्यांदा एकत्र येत आहेत.





दिग्दर्शक महेश मांजरेकर म्हणतात, ‘झी स्टुडिओजसोबत याआधीही अनेकदा काम केले असून पुन्हा एकदा नवा चित्रपट घेऊन आलो आहे. श्रेयस आणि गौरी यांची केमिस्ट्री पाहणं औस्तुक्याचे ठरेल. हळूहळू चित्रपटातील गोष्टी समोर येतीलच.’’


झी स्टुडिओजचे बिझनेस हेड मंगेश कुलकर्णी म्हणतात, “झी स्टुडिओज नेहमीच प्रेक्षकांसाठी दर्जेदार चित्रपट घेऊन येते. झी स्टुडिओज आणि महेश मांजरेकर हे एक समीकरण झालं आहे. त्यामुळे प्रेक्षकांसाठी एक आगळीवेगळी प्रेमकहाणी घेऊन येण्यास आम्ही सज्ज झालो आहोत.” चित्रपटाचे संवाद गणेश मतकरी यांचे आहेत. हा चित्रपट १ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे.

Comments
Add Comment

Dagdusheth Halwai Ganpati : कारगिल, जम्मू, अयोध्या, राजस्थानसह सीमावर्ती भागात ‘दगडूशेठ’ गणपतीची प्रतिष्ठापना

पुणे : महाराष्ट्रासह देशभरात प्रसिद्ध असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची (Dagdusheth Halwai Ganpati) भक्ती देशाच्या सीमेवर

MahaBhumi Stack : आता एका क्लिकवर मिळणार जमीन सर्च रिपोर्ट! महाराष्ट्रात महाभूमी स्टॅकचा मोठा निर्णय

मुंबई : राज्यातील जमीन व्यवहार अधिक पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी महसूल व वन विभागाने ‘महाभूमी स्टॅक’ ही

Dr Sampada Munde Case : डॉ. संपदा मुंडे आत्महत्येप्रकरणी छाननी समिती स्थापन

मुंबई : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमण्यात

Maharashtra Weather Update : सप्टेंबरच्या सुरुवातीलाच हवामान बदलणार; विदर्भात जोरदार पावसाची शक्यता

मुंबई : महाराष्ट्रात ऑगस्ट महिन्यात पावसाने काहीशी ओढ दिल्यानंतर सप्टेंबरच्या सुरुवातीला हवामानात बदल

Jalgaon : काल वाढदिवस...आज काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश, चिमुकल्याला झोळीत गळफास

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे अत्यंत धक्कादायक अन् हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पहिल्या वाढदिवस ,

Medha Kulkarani : धार्मिक उत्सवात अशा कार्यक्रमांची गरज काय...; गणेशोत्सवात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमावरून वाद

पुणे : महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आणि श्रद्धेने साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाला राज्यभरात सुरुवात झाली आहे.