U19 World Cup: सेमीफायनलचे ४ संघ निश्चित, भारताची टक्कर दक्षिण आफ्रिकेशी

मुंबई: पाकिस्तानने बांगलादेशवर ५ धावांनी विजय मिळवताच अंडर १९ वर्ल्डकप २०२४मधील सेमीफायनलमध्ये पोहोचणारे ४ संघ निश्चित झाले आहेत. पाकिस्तानने सुपर सिक्समधील शेवटच्या सामन्यात बांगलादेशवर रोमहर्षक पद्धतीने विजय मिळवला.


भारत, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका हे तीन संघ आधीच सुपर ४मध्ये पोहोचले होते. वर्ल्डकपमधील पहिला सेमीफायनलचा सामना ६ फेब्रुवारीला रंगणार आहे. तर दुसरा सेमीफायनलचा सामना ८ फेब्रुवारीला रंगणार आहे.


पहिल्या सेमीफायनलमध्ये भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेशी रंगणार आहे जो ६ फेब्रुवारीला होईल. भारतीय वेळेनुसार हा सामना दुपारी दीड वाजता सुरू होईल. वर्ल्डकपचा देवादेर भारतीय संघ या स्पर्धेत अजेय आहे. उदय सहारनच्या नेतृत्वात संघाने आपल्या सुपर ६ मधील सामन्यात नेपाळवर मात देत सेमीफायनलमधील स्थान पक्के केले. भारताने लीग स्टेजमध्ये ३ तर सुपर सिक्समध्ये २ सामने जिंकले.

Comments
Add Comment

Lionel Messi : मेस्सीचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा

अर्जेंटिना : अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली

Tiwana Football Club : वांद्र्यातील नेव्हिल डि'सूजा फुटबॉल मैदानावर तिवाना संघाची बाजी

- मुंबई फुटबॉल असोसिएशन फर्स्ट डिव्हिजन २०२६ च्या चषकावर कोरले नाव मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई फुटबॉल

India vs Thailand Women T20 Asia Cup 2026 : भारताचा थायलंडवर ९४ धावांनी दणदणीत विजय; शेफाली वर्माची तुफानी खेळी

दुबई : महिला टी-२० आशिया कप २०२६च्या सलामीच्या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने थायलंडचा ९४ धावांनी पराभव

ENG vs PAK Test Match : लॉर्ड्सवर पाकिस्तानचा ‘काळा दिवस’; १९४ धावांत ऑलआऊट, WTC फायनलच्या शर्यतीतून बाहेर!

लॉर्ड्स : इंग्लंडविरुद्धच्या लॉर्ड्स कसोटीत पाकिस्तानला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. ३८९ धावांच्या

Kagiso Rabada : कागिसो रबाडा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकण्याची शक्यता

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेच्या सुरुवातीपूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे.

Roger Federer : रॉजर फेडररचा 'टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश

नवी दिल्ली : ऱ्होड आयलंडमधील न्यूपोर्ट येथे 'इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश होताना २० वेळा ग्रँडस्लॅम