Shivneri Bus : आता 'अटल' सेतूवरुन पुणे-मंत्रालय/दादर शिवनेरी बस धावणार

मुंबई : शिवडी ते नाव्हाशेवा दरम्यानच्या नव्या "अटल सेतू "वरून (Atal Setu) एसटीची पुणे-मंत्रालय/दादर अशी शिवनेरी बस (Shivneri Bus) सुरू करण्यात आली आहे. प्रायोगिक तत्त्वावर उद्या दिनांक २० फेब्रुवारीपासून दररोज सकाळी पुणे स्टेशन-मंत्रालय (सकाळी ६.३०) आणि स्वारगेट-दादर (७.००) या दोन मार्गावर शिवनेरी बस सुरू करण्यात येत आहेत.


या बसेस पुणे येथून निघून थेट पनवेल नाव्हाशेवा, शिवडी मार्गे मंत्रालय/दादर येथे पोहोचतील. परत ११ वाजता याचमार्गे अनुक्रमे मंत्रालय व दादर येथून निघतील. यामुळे गर्दीच्या वेळी प्रवासाचा सुमारे १ तास वाचणार आहे.


तिकीट दरामध्ये कोणताही बदल केलेला नाही. तरी प्रवाशांनी शिवनेरी बस फेऱ्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे. या बस फेऱ्या अर्थात, एसटीच्या अधिकृत msrtc mobile reservation ॲप वर व www.msrtc.gov.in संकेतस्थळावर आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे, अशी माहिती एसटी महामंडळाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.


दरम्यान, मुंबईवरुन पुण्याला जाताना अटल सेतूचा वापर केल्यामुळे पनवेल एसटी स्थानक वगळावे लागणार आहे. पनवेलसह अन्य लहान-मोठे थांबेही घेता येणार नाहीत. त्यामुळे आता शिवनेरी बस अटल सेतूवरुन नेण्याचा पर्याय कितपत यशस्वी ठरतो, हे पाहावे लागेल.


शिवडी- नाव्हाशेवा अटल सेतूवरुन प्रवास करणाऱ्या वाहनांकडून २५० रुपये इतका टोल आकारला जातो. त्यामुळे या मार्गावरुन धावणाऱ्या शिवनेरी बसचे तिकीट वाढणार का, हा प्रश्न होता. परंतु, एसटी महामंडळाने अटल सेतूवरुन धावणाऱ्या शिवनेरी बसेससाठी तिकीट दरात कोणताही बदल केलेला नाही. अटल सेतूवरुन मुंबईतून निघालेली बस अवघ्या २० मिनिटांत सिग्नलमुक्त मार्गाने चिर्ले येथे पोहोचणे शक्य होणार आहे. चिर्लेहून ६० किमी अंतरावर मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आहे. अटल सेतूच्या मार्गाने पुणे ते दादर हे अंतर वाशी, कळंबोली मार्गापेक्षा पाच किलोमीटरने कमी भरते. याशिवाय, वाहतूक कोंडीची समस्या विचारात घेतल्यास शिवनेरी बस अटल सेतूवरुन नेल्यास प्रवासाचा वेळ साधारण तासाभराने कमी होईल, असा अंदाज आहे. त्यामुळे पुणे-मुंबई प्रवासाचा अनुभव आता आणखी सुखकारक होणार आहे.

Comments
Add Comment

Nanded Accident : सहस्त्रकुंड धबधबा पाहून परतताना काळाचा घाला; जीप झाडावर आदळली, 3 भाविकांचा मृत्यू

नांदेड : सहस्त्रकुंड धबधबा आणि महादेव मंदिराचे दर्शन घेऊन तेलंगणाकडे परतणाऱ्या भाविकांच्या जीपचा नांदेड

Pune Rain Alert : पुणेकरांनो, छत्री तयार ठेवा! पावसाचं पुन्हा आगमन; हवामान विभागाचा महत्त्वाचा अंदाज

पुणे : गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने पुणे शहरात उकाडा आणि दमटपणात वाढ झाली आहे. ढगाळ

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.