Kokan Railway: कोकण चाकरमान्यांसाठी खुशखबर! प्रवासाची धावपळ थांबणार

उन्हाळी हंगामात अतिरिक्त ट्रेन धावणार


मुंबई : उन्हाळ्याची सुट्टी पडताच अनेक जण आपल्या गावी किंवा बाहेर फिरायला जातात. लाखो प्रवाशांचा धुमाकुळ तसेच गाड्यांची अतिरिक्त गर्दी पाहून यावेळी कोकण रेल्वेने (Kokan Railway) उन्हाळी हंगामात (Summer season) विविध मार्गांवर विशेष गाड्या (special trains) चालवण्याचा निर्णय घेतला आहे.


एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची रेलचेल दिसून येत आहे. अशातच उन्हाळ्यात चाकरमान्यांची धावपळ होऊ शकते. यामुळे नियोजित मार्गांवर धावणाऱ्या गाड्यांमध्ये प्रवाशांची अतिरिक्त गर्दी होण्याची शक्यता असते. त्यामुळं प्रवाशांची हैराणी थांबवण्यासाठी कोकण रेल्वेकडून ७ एप्रिल ते ६ जून या कालावधीत या विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत.


पहिल्या टप्प्यात उधना जंक्शन - मंगळुरु जंक्शन (09057) ही विशेष द्विसाप्ताहिक गाडी चालवली जाणार आहे. उधना जंक्शन - मंगळुरु जंक्शन (09057) ही गाडी ७ एप्रिल ते ५ जून या कालावधीत प्रत्येक बुधवार आणि रविवारी उधना जंक्शन येथून रात्री ८ वाजता सुटणार. तर, दुसऱ्या दिवशी सांयकाळी ७ वाजता मंगळुरू जंक्शनला पोहोचेल. त्याचप्रमाणे मंगळुरू जंक्शन-उधना जंक्शन (09058) ही विशेष द्विसाप्ताहिक गाडी ८ एप्रिल ते ६ जून यादरम्यान प्रत्येक गुरुवारी आणि सोमवारी चालवली जाणार आहे.


उधना जंक्शन-मंगळुरु जंक्शन गाडी वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी, मडगाव या स्थानकांवर थांबेल. ही गाडी एकूण २३ डब्यांची असून त्यात तीन वातानुकूलित कोच असणार आहेत, अशी माहिती कोकण रेल्वेने दिली आहे.


Comments
Add Comment

कोकणात 125 एकरात उभारणार फिल्म सिटी, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्याकडून कामाला वेग

कोकण: रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील पालशेत गावात शासकीय भूखंडावर चित्रपट निर्मिती आणि पर्यटनाला

Nitesh Rane News: सिंधुदुर्गमधील नुकसानीसाठी स्वतंत्र निकषांचा विचार करा- पालकमंत्री नितेश राणे यांची कृषिमंत्र्यांकडे मागणी

मुंबई: "सिंधुदुर्ग जिल्हा दुष्काळाच्या ट्रिगर-१ मध्ये येत असून, जिल्ह्यातील पिकांच्या नुकसानीचे तातडीने

Ganpati Special Train: गावी जाणाऱ्या गणेशभक्तांना रेल्वेकडून मोठा दिलासा, मुंबई- कोकण मार्गावर धावणार १२ विशेष गाड्या

मुंबई: गणेशोत्सवासाठी मुंबईहून कोकणामध्ये जाणाऱ्या प्रवाशांच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी आहे. मध्य

Nitesh Rane News: गणेशभक्तांना घेऊन पहिली ‘मोदी एक्सप्रेस’ कोकणच्या दिशेने रवाना, मंत्री नितेश राणे यांनी दाखवला हिरवा झेंडा

मुंबई: गणेशोत्सवासाठी कोकणच्या दिशेने निघालेल्या चाकरमान्यांच्या प्रवासाला यंदाही ‘मोदी एक्सप्रेस’ची साथ

Ganpati 2026 Special Train: कोकणवासियांसाठी गणपती विशेष ट्रेन, कुठून कधी धावणार? वाचा संपूर्ण वेळापत्रक

मुंबई: गणेशोत्सवानिमित्त नोकरदारांची आपल्या गावी जाण्यासाठी सध्या एकच गर्दी पाहायला मिळत आहे. रेल्वे, एसटी बस,

Ganesh Utsav 2026 Konkan toll waiver : गणेशभक्तांच्या कोकण प्रवासाला टोलमाफी; अटल सेतू’सह प्रमुख महामार्गांवर पथकर सवलत

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात आपल्या मूळ गावी जाणाऱ्या लाखो गणेशभक्तांना राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे.