Eknath Khadse : भाजपा माझं घर; पक्षाच्या पायाधरणीपासून मी भाजपामध्ये!

भाजपात घरवापसी करण्याच्या निर्णयावर एकनाथ खडसे यांचं स्पष्टीकरण


कधी करणार पक्षप्रवेश? स्वतः सांगितला मुहूर्त...


जळगाव : पूर्वी भाजपमध्ये (BJP) असलेले मात्र काही कारणास्तव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) प्रवेश केलेले एकनाथ खडसे (Eknath Khadse) राज्याच्या राजकारणातील मोठे नेते आहेत. जळगाव (Jalgaon) मतदारसंघात त्यांची मोठी ताकद आहे. राष्ट्रवादीचा नेता म्हणून त्यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांची बाजू लावून धरली होती. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतरही त्यांनी अजित पवारांसोबत (Ajit Pawar) न जाता शरद पवारांसोबत राहणं पसंत केलं होतं. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ते पुन्हा एकदा घरवापसी करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. शिवाय भाजपाच्या नेत्यांचीही एकनाथ खडसेंबाबत स्वागतार्ह भूमिका होती. या चर्चेवर आता खुद्द एकनाथ खडसे यांनी शिक्कामोर्तब केले असून लकवरच ते भाजपात प्रवेश करणार आहेत.


एकनाथ खडसे दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा (J P Nadda) यांच्याशी चर्चा करून आज त्यांच्या मतदारसंघात परतले आहेत. यावेळी एकनाथ खडसे म्हणाले की, आपण लवकरच येत्या पंधरा दिवसात भाजप मध्ये प्रवेश करणार आहे. कोणत्याही अटीशर्ती शिवाय मी प्रवेश करणार असल्याचे एकनाथ खडसेंनी स्पष्ट केले आहे.


'भाजपा हे माझे घर आहे. पक्षाच्या पायाधरणीपासून मी भाजपामध्ये राहिलो आहे. भाजपमध्ये माझं योगदान राहिलं आहे. चाळीस वर्षे मी भाजपामध्ये होतो. काही नाराजीमुळे मी भाजपामधून बाहेर पडलो होतो. मात्र आता माझी नाराजी कमी झाल्याने मी पक्षात पुन्हा प्रवेश करत आहे', असे एकनाथ खडसे यांनी सांगितले.



शरद पवारांचा मी ऋणी


शरद पवार (Sharad Pawar) यांनी संकटकाळात साथ दिली याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. आता जी परिस्थिती आहे ती मी जयंत पाटील (Jayant Patil) यांना सांगितली. त्यांची अनुकूलता पाहून मी भाजपामधे जाण्याचा हा निर्णय घेतला असल्याची माहिती एकनाथ खडसे यांनी दिली. दरम्यान, एकनाथ खडसे यांच्या घरवापसीमुळे जळगावात भाजपाची ताकद आणखी वाढणार आहे. त्यामुळे आता जळगाव लोकसभेची निवडणूक आणखी निकराची होईल.

Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा