Mc Mary Kom : मेरी कोमने दिला पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारताच्या अभियान प्रमुख पदाचा राजीनामा

अचानक हा निर्णय घेण्याचं काय आहे कारण?


नवी दिल्ली : तब्बल सहा वेळा वर्ल्ड चॅम्पियन (World champion) राहिलेली भारताची बॉक्सर एमसी मेरी कॉमने (Boxer MC Mary Kom) आज पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारताच्या अभियानाचे प्रमुख पद (Paris Olympics Chef De Mission) सोडल्याची बातमी समोर आली आहे. मेरी कॉमने भारतीय ऑलिम्पिक संघाच्या अध्यक्षा पीटी उषा (PT Usha) यांना पत्र लिहून आपण वैयक्तिक कारणामुळे हे पद सोडत असल्याचे सांगितले.


मेरी कॉमने पत्रात लिहिले की, 'देशाची कोणत्याही स्वरूपात सेवा करणे ही अभिमानाची बाब असते. मी हे पद स्विकारण्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार होते. मात्र मला खेदपूर्वक सांगावं लागतंय की मी ही जबाबदारी घेऊ शकत नाही. मी वैयक्तिक कारणामुळे हे पद सोडत आहे. या प्रकारे मी या जबाबदारीपासून मागे हटत आहे याची शरम वाटते. मी कधी असे करत नाही. मात्र आता माझ्याकडे कोणताच पर्याय नाही. ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम मी कायम करेन.'


आयओएने २१ मार्चला मेरी कॉमची या पदावर नियुक्ती केली होती. लंडन ऑलिम्पिकमध्ये मेरी कॉमने कांस्य पदक जिंकले होते. २६ जुलै ते ११ ऑगस्ट या दरम्यान होणाऱ्या ऑलिम्पिक खेळात भारतीय संघाची ती अभियान प्रमुख होती.


याबाबत पीटी उषा यांनी सांगितले की, 'ऑलिम्पिक पदक विजेती बॉक्सर आणि आयओए अॅथलिट आयोगाची प्रमुख मेरी कॉमला वैयक्तिक कारणामुळे या पदावरून हटावे लागत आहे याचा आम्हाला खेद आहे. आम्ही तिच्या या निर्णयाचा आणि वैयक्तिक आयुष्याचा सन्मान करतो. मेरी कॉमच्या पर्यायाबद्दल लवकरच घोषणा केली जाईल. मी मेरी कॉमला सांगितले आहे की आयओए आणि माझा तिला कायम पाठिंबा राहणार आहे. मी सर्वांना तिच्या वैयक्तिक आयुष्याचा सन्मान करण्याची विनंती करते'.

Comments
Add Comment

प्रेमासाठी काय पण ! 75 वर्षीय रामसुगर 30 वर्षांच्या रानी राजपूतशी बांधणार लग्नगाठ, साखपुड्याचा व्हिडीओ व्हायरल

उत्तर प्रदेश : प्रेमाला वयाचं बंधन नसतं, असं म्हटलं जातं. उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यातील एका अनोख्या

Saurabh Rajput Murder Case : सौरभ राजपूत हत्या प्रकरणात फाशीची शिक्षा; निर्भया प्रकरणातील जल्लाद पवन यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Saurabh Rajput Murder Case: मेरठमधील सौरभ राजपूत हत्या प्रकरणात मुस्कान रस्तोगी आणि साहिल शुक्ला यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात

Supreme Court Verdict : धर्मांतरानंतर आरक्षण मिळणार का? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : धर्मांतर केलेल्या व्यक्तीला पूर्वीच्या धर्मातील सामाजिक मागासलेपणाच्या आधारे आरक्षण किंवा विशेष

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी