मुंबईत आरटीई’ अंतर्गत १३८३ पात्र शाळांमध्ये एकूण २९ हजार ०१४ जागा उपलब्ध

२५ टक्के आरक्षित जागांसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेस सुरूवात


मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी ‘शिक्षण हक्क अधिनियम’ अर्थात ‘आरटीई’ अंतर्गत पालिका,सरकारी आणि खासगी प्राथमिक शाळांमध्ये २५ टक्के आरक्षित जागांसाठीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेस मंगळवार १६ एप्रिलपासून प्रारंभ झाला आहे. ‘आरटीई’ अंतर्गत ऑनलाईन प्रवेशाची अंतिम मुदत मंगळवार ३० एप्रिल पर्यंत असणार आहे. तत्पूर्वी पालकांनी आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी अर्ज करावेत,असे आवाहन पालिकेने केले आहे .


आरटीई अंतर्गत दुर्बल,वंचित,शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागासवर्ग घटकांकरिता विद्यार्थ्याच्या घरापासून १ किलोमीटर अंतरावरील खासगी शाळेत २५ टक्के आरक्षित कोट्यातून मोफत प्रवेश दिले जातात. त्यानुसार,मुंबईतील १३८३ पात्र शाळांमधील आरटीईच्या २५ टक्के मोफत प्रवेशासाठी २९ हजार ०१४ जागा उपलब्ध आहेत. या प्रवेशासाठी पालकांना महाराष्ट्र शासनाच्या https://student.maharashtra.gov.in/adm_portal या संकेत स्थळावरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येतील.


प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करुन आजपासून पाल्याच्या प्रवेशासाठी अर्ज करता येणार आहेत. प्रवेश प्रक्रियेच्या अर्जासोबत कोणत्याही प्रकारची कागदपत्रे अपलोड करण्याची आवश्यकता असणार नाही, अशी माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक)राजेश कंकाळ यांनी दिली आहे. आरटीई अंतर्गत मुंबईतील एस.एस.सी. बोर्डाच्या १३१९ तर अन्य ६४ अशा मिळून १३८३ पात्र शाळांमध्ये २५ टक्के मोफत प्रवेशासाठी २९ हजार ०१४ जागा उपलब्ध आहेत. यामध्ये एस.एस.सी. बोर्ड २७ हजार ८६९ तर अन्य ११४५ जागांचा समावेश आहे. यापूर्वी ही प्रक्रिया फक्त विनाअनुदानीत खासगी शाळांसाठी लागू असायची. मात्र, या वर्षीपासून या प्रक्रियेमध्ये सरकारी शाळा, महानगरपालिकेच्या शाळा यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे यंदा तब्बल १ हजार शाळांची वाढ झाली आहे. तर जवळपास २० हजार जागादेखील वाढल्या आहेत. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना आता घरापासून १ किलोमीटरच्या आत असणाऱया शाळेमध्ये मोफत प्रवेश मिळणार आहे.

Comments
Add Comment

Ganpati Visarjan 2026: गणपती विसर्जनासाठी मध्य आणि हार्बर रेल्वेवर २२ जादा लोकल फेऱ्या, एका क्लिकवर जाणून घ्या टाईम टेबल

मुंबई: अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती विसर्जन करून रात्री उशिरापर्यंत घरी परतणाऱ्या गणेशभक्तांसाठी मध्य

BMC : मुंबईत वायू प्रदुषणाची भीती, महापालिका यंत्रणा अलर्ट

येत्या १ ते १५ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत विशेष अभियान राबवणार मोठ्या प्रकल्पांवर लक्ष ठेवण्यासाठी नोडल

Mumbai Ganeshotsav 2026 : गणेश मूर्ती विसर्जनासाठी महापालिका सज्ज

तब्बल २५ हजारांहून अधिक अधिकारी,कर्मचाऱ्यांचा फौजफाटा एकूण ५०६ रस्त्यांवरील ४ हजार २७९ खड्डे बुजवले यंदा ‘एक

Kalyan- Kasara Block: कल्याण-कसारा मार्गावरील प्रवाशांसाठी पुन्हा ब्लॉकचे संकट; शनिवारी घेणार विशेष ट्रॅफिक ब्लॉक

कल्याण: मध्य रेल्वेवरील प्रवाशांच्या दृष्टीने एक महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेवरील टिटवाळा स्थानकावर

Jogeshwari Station CCTV Video: 'काळ आला होता पण…', जोगेश्वरी रेल्वे स्थानकावरील थरार! RPF जवानानी प्रवाशाला दिले जीवनदान

मुंबई: अनेकदा रेल्वे स्थानकांवर प्रवाशांच्या घाई गडबडीमध्ये अपघात होण्याचा प्रकार घडताना आपण पाहिलं असेल.

BMC Guidelines : गणेशोत्सवासाठी बीएमसीची 'कडक' नियमावली! प्रसाद, अग्निसुरक्षा अन् स्वच्छतेबाबत नवे नियम जाहीर

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) आगामी गणेशोत्सवाच्या (Ganeshotsav 2026)  पार्श्वभूमीवर भाविक आणि सार्वजनिक गणेशोत्सव