Jogeshwari Station CCTV Video: 'काळ आला होता पण…', जोगेश्वरी रेल्वे स्थानकावरील थरार! RPF जवानानी प्रवाशाला दिले जीवनदान

मुंबई: अनेकदा रेल्वे स्थानकांवर प्रवाशांच्या घाई गडबडीमध्ये अपघात होण्याचा प्रकार घडताना आपण पाहिलं असेल. रेल्वेतून उतरताना किंवा पकडताना प्रवाशाचा निष्काळजीपणा त्याच्या अंगलट येतो. पण नशीब बलवत्तर म्हणून, बऱ्याचदा रेल्वे पोलीस आणि होम गार्ड अनेकदा या प्रवाशांच्या मदतीला धावून येतात आणि त्याचे प्राण वाचवतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हायरल व्हिडिओमध्ये एक प्रवासी चालती लोकल पकडण्याचं धाडस करतोय. पण त्याला लगेचच काही आरपीएफ जवानांनी वाचवण्याचा प्रयत्न केला.



पश्चिम रेल्वेवरील जोगेश्वरी स्थानकावरील १६ सप्टेंबरच्या रात्रीची ही घटना आहे. 'गेम्स ऑफ रेल्वे' नावाच्या एक्स अकाऊंटवर घटनेचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. धावती लोकल पकडताना काही दुर्घटना घडण्याच्या अगोदरच दोन आरपीएफ जवानांनी त्या प्रवाशाचे प्राण वाचवले आहे. पोलिसांनी त्या तरूणाचे प्राण वाचवले असून त्याला एक प्रकारे जीवनदान देण्याचे काम केले आहे. सध्या ही व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओपाहून अनेकांनी आरपीएफ जवानाचं कौतुक केलं आहे. ही संपूर्ण घटना स्टेशनवरील सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झालाय.

 



या व्हिडीओला अवघ्या काही तासांमध्ये, २९ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांकडून पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. कोणताही वेळ न घालवता पोलिसांनी वाचवलेल्या जीवाचे नेटकऱ्यांकडून कौतुक होत आहे. आरपीएफ जवान कायमच दिवस असो किंवा रात्र डोळ्यामध्ये तेल घालून प्रवाशांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असतात. अनेकदा लोकलच्या दरवाज्यामध्ये लटकणाऱ्या प्रवाशांना ओरडण्याचं काम सुद्धा ते करत असतात. या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा एकदा पोलिसांची कार्यतत्परता अधोरेखित झाली आहे.

Comments
Add Comment

BMC : मुंबईत वायू प्रदुषणाची भीती, महापालिका यंत्रणा अलर्ट

येत्या १ ते १५ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत विशेष अभियान राबवणार मोठ्या प्रकल्पांवर लक्ष ठेवण्यासाठी नोडल

Mumbai Ganeshotsav 2026 : गणेश मूर्ती विसर्जनासाठी महापालिका सज्ज

तब्बल २५ हजारांहून अधिक अधिकारी,कर्मचाऱ्यांचा फौजफाटा एकूण ५०६ रस्त्यांवरील ४ हजार २७९ खड्डे बुजवले यंदा ‘एक

Kalyan- Kasara Block: कल्याण-कसारा मार्गावरील प्रवाशांसाठी पुन्हा ब्लॉकचे संकट; शनिवारी घेणार विशेष ट्रॅफिक ब्लॉक

कल्याण: मध्य रेल्वेवरील प्रवाशांच्या दृष्टीने एक महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेवरील टिटवाळा स्थानकावर

BMC Guidelines : गणेशोत्सवासाठी बीएमसीची 'कडक' नियमावली! प्रसाद, अग्निसुरक्षा अन् स्वच्छतेबाबत नवे नियम जाहीर

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) आगामी गणेशोत्सवाच्या (Ganeshotsav 2026)  पार्श्वभूमीवर भाविक आणि सार्वजनिक गणेशोत्सव

Ganeshotsav 2026 : लालबागच्या राजाच्या दरबारात अंबानी कुटुंब! मुकेश अंबानी, अनंत आणि राधिकाने घेतले दर्शन, आरतीतील व्हिडिओ व्हायरल!

मुंबई : मुंबईत गणेशोत्सवाचा उत्साह (Ganeshotsav 2026) शिगेला पोहोचला असून शहरातील अनेक दिग्गज मंडळी बाप्पाच्या दर्शनासाठी

Mumbai Accident : ब्रेकिंग ! ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांच्या कारची पादचाऱ्याला धडक; एक जण जखमी

मुंबई : ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांच्या कारचा पादचाऱ्याला धडक लागून अपघात झाल्याची घटना मुंबईतील