Kunwar Sarvesh Kumar : धक्कादायक! मतदानाच्या दुसऱ्याच दिवशी भाजपा उमेदवाराचा मृत्यू

निवडणुकीचे आता पुढे होणार काय?


मुरादाबाद : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिल रोजी पार पडलं. आता २६ एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. यादरम्यान, भाजपाच्या एका उमेदवाराचं मतदानाच्या दुसऱ्याच दिवशी निधन झाल्याची धक्कादायक घटना घडली. भाजपाचे माजी खासदार आणि मुरादाबाद लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार कुंवर सर्वेश कुमार सिंह (७२) यांचे काल दु:खद निधन झाले.


मिळालेल्या माहितीनुसार, कुंवर सर्वेश सिंह यांच्या गळ्याला त्रास होत होता व त्याचं ऑपरेशन करण्यात आलं होतं. १९ एप्रिल रोजी ते तपासणीसाठी दिल्लीतील एम्स रुग्णालयात गेले होते मात्र त्यांनी रुग्णालयातच अखेरचा श्वास घेतला.


माजी खासदार कुंवर सर्वेश सिंह यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शोक व्यक्त केला. मुरादाबाद लोकसभा मतदारसंघातील भाजपा उमेदवार आणि माजी खासदार कुंवर सर्वेश सिंह यांच्या निधनाने धक्का बसला. भाजपासाठी ही कधीही न भरून येणारी हानी आहे, असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले. तसेच 'भाजपाचे नेते आणि मुरादाबादमधील भाजपा कार्यकर्त्यांचे प्रेरणास्रोत माजी खासदार कुंवर सिंह यांच्या आकस्मिक निधनाने मोठा धक्का बसला. कुंवर सर्वेश सिंह यांचं निधन फक्त मुरादाबाद नव्हे तर उत्तर प्रदेशातील भाजपासाठी मोठं नुकसान असल्याचं' भूपेंद्र सिंह चौधरी यांनी म्हटले.



निवडणुकीचे पुढे काय होणार?


सिंह यांच्या मृत्यूची बातमी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली असून याबाबत निवडणुकीवर काहीही परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट केले. मतमोजणी ठरलेल्या दिवशीच केली जाणार. कुंवर सर्वेश सिंह हे विजयी ठरले तर पोटनिवडणूक घेतली जाईल व पराभव झाल्यास काही फरक पडणार नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

प्रेमासाठी काय पण ! 75 वर्षीय रामसुगर 30 वर्षांच्या रानी राजपूतशी बांधणार लग्नगाठ, साखपुड्याचा व्हिडीओ व्हायरल

उत्तर प्रदेश : प्रेमाला वयाचं बंधन नसतं, असं म्हटलं जातं. उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यातील एका अनोख्या

Saurabh Rajput Murder Case : सौरभ राजपूत हत्या प्रकरणात फाशीची शिक्षा; निर्भया प्रकरणातील जल्लाद पवन यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Saurabh Rajput Murder Case: मेरठमधील सौरभ राजपूत हत्या प्रकरणात मुस्कान रस्तोगी आणि साहिल शुक्ला यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात

Supreme Court Verdict : धर्मांतरानंतर आरक्षण मिळणार का? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : धर्मांतर केलेल्या व्यक्तीला पूर्वीच्या धर्मातील सामाजिक मागासलेपणाच्या आधारे आरक्षण किंवा विशेष

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी