IPL 2024: ऋषभ पंतच्या टीमला मोठा झटका, आयपीएलमधून बाहेर झाला हा स्टार

मुंबई: आयपीएल २०२४मध्ये(ipl 2024) दिल्ली कॅपिटल्सची कामगिरी काही चांगली राहिलेली नाही. दिल्लीने आठपैकी केवळ ३ सामन्यात विजय मिळवला.


आता यातच आयपीएलच्या या हंगामात ऋषभ पंतच्या नेतृत्वातील दिल्ली कॅपिटल्सला मोठा झटका बसला आहे. ऑस्ट्रेलियन ऑलराऊंडर मिचेल मार्श आयपीएल २०२४च्या इतर सामन्यांमधून बाहेर झाला आहे. मार्शला दुखापत झाल्याने तो काही दिवस आधीच ऑस्ट्रेलियाला परतला आहे.


दिल्ली कॅपिटल्सचे मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंगने सांगितले, मला नाही वाटत की तो परत येईल. क्रिकेट ऑस्ट्रेलियाला त्याची दुखापत बरी करण्यासाठी त्याला घरीच ठेवायचे होते. आम्ही जितके शक्य होईल तितके त्याला परत पाठवले.


आयपीएल २०२४मध्ये मिचेल मार्शने दिल्ली कॅपिटल्ससाठी खेळताना चार डावांत १५.२५ च्या सरासरीने ६१ धावा केल्या.


मार्शची सर्वोत्कृष्ट धावसंख्या २३ इतकी होती. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध तर खाते खोलण्यातही अपयश आले होते.

Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून