IPL 2024: कोलकाताने दिल्लीला हरवत पॉईंट्स टेबलमध्ये केला बदल?

मुंबई: आयपीएल २०२४मधील ४७वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळवण्यात आला होता. यात कोलकाता नाईट रायडर्सने बाजी मारली. ईडन गार्डन्समध्ये खेळवण्यात आलेल्या या सामन्यात कोलकाताने ७ विकेटनी विजय मिळवला. हा केकेआरचा एकतर्फी विजय होता. आता या विजयानंतर पॉईंट्स टेबलमध्ये काय बदल झाले आहेत ते जाणून घेऊया...


दिल्लीविरुद्ध विजय मिळवल्यानंतर कोलकाता १२ गुण आणि +1.096 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर पराभव झालेला दिल्लीचा संघ सहाव्या स्थानावर आहे. दिल्लीकडे १० गुण आणि -0.442 हा रनरेट आहे.


पॉईंट्सटेबलमधील टॉप ४ संघांवर नजर टाकली असताना राजस्थान रॉयल्स १६ पॉईंट्ससह अव्वल स्थानावर आहे. त्यानंतर कोलकाता १२ पॉईंट्ससह दुसऱ्या स्थानावर येते. यानंतर चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायजर्स हैदराबाद १०-१० गुणांसह अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत. चेन्नईकडे +0.810 आणि हैदराबादकडे +0.075 चा रनरेट आहे.



बाकी संघाची अशी स्थिती


बाकी संघाना पाहिल्यास लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स १०-१० गुणांसह अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या स्थानावर आहेत. त्यानंतर गुजरात टायटन्स ८ गुणांसह सातव्या स्थानावर आहे. त्यानंतर पंजाब किंग्स, मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ६-६ गुणांसह अनुक्रमे आठव्या, नवव्या आणि दहाव्या स्थानावर आहेत.

Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून