Crime : मातृदिनी सासू-सुनेच्या नात्याला काळीमा! मुलाच्या मदतीने केली सुनेची निर्घृण हत्या

सासूने पकडले पाय तर पतीने दाबला गळा


नवी दिल्ली : आज जगभरात आईविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मातृदिन साजरा केला जात आहे. याच आईचे दुसरे रुप म्हणजे सासू. पण सासू-सुनेच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना नोएडामधील गौतमबुद्ध नगर युनिव्हर्सिटी परिसरात समोर आली आहे. यामध्ये सासूने आपल्या मुलाचीही मदत घेत सुनेचा गळा दाबून तिला पाण्याच्या टाकीत फेकले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.


नोएडामधील गौतमबुद्ध नगर युनिव्हर्सिटी परिसरातील एका कुटुंबामधील सासरच्यांनी त्यांच्या सुनेची घृणास्पद हत्या केल्याची ह्दयद्रावक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सासू व नवऱ्याने स्वत:च्या बायकोची हत्या केली असल्याचा खुलासा नोएडा पोलिसांकडून करण्यात आला आहे. क्षुल्लक कारणावरून सासू आणि सूनेमध्ये वाद झाला होता. या वादाचं रुपांतर नंतर हाणामारीत झालं आणि सासू आणि पतीने मिळून महिलेची हत्या केली. गौतमबुद्ध नगर युनिव्हर्सिटीतील स्टाफ क्वार्टरमधील पाण्याच्या टाकीत नोएडा पोलिसांना एका महिलेचा मृतदेह सापडला होता. त्या हत्येचं गूढ पोलिसांनी उकललं असून महिलेची हत्या तिचा पती कपिल आणि सासू सुमित्रा यांनी केल्याचे उघड झाले.



सासूने पकडले पाय, पतीने दाबला गळा


ग्रेटर नोएडाचे अतिरिक्त डीसीपी अशोक कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, सासू सुमित्रा यांनी पूनमचे ​​पाय धरले होते, तर पती कपिलने तिचा गळा दाबला होता, असे चौकशीदरम्यान सांगत पूनमची हत्या केल्याचं कबूल केलं आहे. पूनम आणि तिची सासू सुमित्रा यांच्यात कडाक्याचं भांडण झालं होतं. कपिलही या भांडणात सामील झाला होता. नंतर हे भांडण टोकाला पोहोचलं, यावेळी कपिलने पूनमला धक्का दिला, ज्यामुळे ती खाली पडली. यानंतर सासू सुमित्राने पूनमचे ​​पाय धरले आणि पती कपिलने तिचा गळा दाबून तिची हत्या केली.


दरम्यान, पूनमच्या मृत्यूनंतर तिचा मृतदेह स्टाफ क्वार्टरमधील सिमेंटच्या पाण्याच्या टाकीत टाकून आई आणि मुलगा दोघांनी पळ काढला. मॅन्युअल इंटेलिजन्स आणि इलेक्ट्रॉनिक सर्विलंसच्या मदतीने आरोपी कपिल आणि सुमित्रा या दोघांना जिम्स तिराहा येथून नोएडा पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.


Comments
Add Comment

आता तिकीट बुकिंग होणार सोपी! 'या' गाड्यांचे PNR नंबर्स बदलणार

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नोव्हेंबर किंवा डिसेंबरच्या तिसऱ्या

Kolkata Stampede: अरुंद प्रवेशद्वार, अंधार अन् अफवा; दुर्गापूजा मंडपातील चेंगराचेंगरीचं कारण काय?

कोलकाता येथील चोरबागान दुर्गा पूजा मंडपात झालेल्या चेंगराचेंगरीनंतर, आयोजकांच्या व्यवस्थेवर गंभीर प्रश्न

Kolkata Stampede : कोलकाता दुर्गापूजा चेंगराचेंगरी प्रकरणात आयोजकांसह 7 जणांना अटक; घोषणेमुळे गर्दी उसळल्याचा दावा

Kolkata Stampede: पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे चोरबागान दुर्गापूजा मंडपात झालेल्या चेंगराचेंगरीप्रकरणी पोलिसांनी

Kolkata Stampede: कोलकात्यात दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी; 19 जणांचा मृत्यू, 25 जखमी

कोलकत्ता :  पश्चिम बंगालमधील उत्तर कोलकाता येथील चोरबागान सार्वजनिक दुर्गापूजा मंडपात शनिवारी रात्री

सिद्धु मुसेवालाच्या छोट्या भावामुळे आई- वडिलांविरोधात तक्रार दाखल, नेमकं काय घडलं?

मुंबई: प्रसिद्ध पंजाबी गायक आणि रॅपर सिद्धु मुसेवाला आज या जगात नाही, जरीही तो आज आपल्यात नसला तरीही तो त्याच्या

Supreme Court Decision On Internet : सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय : लहान मुलांसाठीही 'इंटरनेट' हा मूलभूत हक्क; वापरावर पूर्ण बंदी घालण्यास ठाम नकार

नवी दिल्ली : लहान मुलांच्या ऑनलाइन सुरक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाने (सुप्रीम कोर्ट) एक अत्यंत महत्त्वाचा आणि