मुंबई: प्रसिद्ध पंजाबी गायक आणि रॅपर सिद्धु मुसेवाला आज या जगात नाही, जरीही तो आज आपल्यात नसला तरीही तो त्याच्या गाण्यांच्या माध्यमातून चाहत्यांमध्ये जिवंत आहे. गायक आणि रॅपर सिद्धु मुसेवालाचं निधन 29 मे 2022 रोजी, पंजाबमधील मानसा जिल्ह्यातील जवाहरके गावात गोळ्या झाडून त्याची हत्या करण्यात आली. त्याच्या हत्येनंतर त्यांनी आणखी एका बाळाला जन्म दिला. छोटा सिद्धु म्हणून चाहत्यांमध्ये फेमस असलेला शुभदीप सिंह सिद्धु सध्या कमालीचा चर्चेत आला आहे. दोन वर्षीय शुभदीपचे कॅनडातील टोरंटोमध्ये झालेल्या एका खास कॉन्सर्टमधील अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
[caption id="attachment_1067306" align="alignnone" width="850"] बॉलीवूड अभिनेता आणि दुबईतील बिझनेसमन विवेक ओबेरॉय सध्या आपल्या दुबईतील व्हिलामुळे चर्चेत आला आहे. 1,120 कोटी रुपयांपेक्षा जास्त ...
कॅनडामध्ये झालेल्या कॉन्सर्टमध्ये सिद्धुच्या छोट्या भावाने त्याची फेमस असलेली 'थापी' स्टाईल भर स्टेजवर चाहत्यांना करून दाखवली. पण आता हिच स्टाईल त्याला आता भोवलीये. सिद्धु मुसेवालाचे आई- वडीलांच्या विरोधात पोलिसांनी एफआयआर नोंदवली आहे. मांडीवर हात ठेवून अल्पवयीन मुलाने भरस्टेजवर बंदुकी सारखा इशारा केल्यामुळे त्याच्या आई- वडिलांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. लॉयर्स फॉर ह्युमन राइट्स इंटरनॅशनल (LFHRI) या संस्थेने शुक्रवारी मानवाधिकारांसाठी असलेल्या मानसा येथील जिल्हाधिकारी आणि जिल्हा बाल संरक्षण युनिटकडे औपचारिक तक्रार दाखल केली. या संस्थेने, 'छोटा सिद्धू' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या अडीच वर्षांच्या शुभदीप सिंग सिद्धूच्या सुरक्षिततेसाठी आणि कल्याणासाठी कारवाई करण्याची मागणी केली आहे.
सिंगर सिद्धू मूसेवाला के छोटे भाई शुभदीप #SidhuMooseWala https://t.co/VgCYL8Ay0s
— अल्हड़ पत्रकार (@Rajesh__Jamaal) October 14, 2026
शुभदीप सिंग सिद्धू हा सिद्धू मुसेवालाचा छोटा भाऊ आहे. LFHRI चे महासचिव नवकिरण सिंग यांनी ही तक्रार 17 ऑक्टोबर रोजी, स्पीड पोस्टद्वारे मानसा जिल्हाधिकारी आणि जिल्हा बाल संरक्षण युनिट या दोघांनाही पाठवली आहे. LFHRI च्या महासचिवांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, 9 ऑक्टोबर 2026 रोजी, टोरोंटोच्या स्कोटियाबँक एरिना येथे 'साइन टू गॉड वर्ल्ड टूर' या होलोग्राम कॉन्सर्टचा शो होता. या शो दरम्यान, अडीच वर्षांच्या शुभदीपला मंचावर आणण्यात आले. शुभदीपने भरस्टेजवर पिस्तुलासारखी ॲक्शन करत, पुढे 'था था था' असा आवाज काढला आणि त्याच्या दिवंगत भावाची फेमस 'थापी' स्टाईल केली. ही स्टाईल त्याने मांडी थोपटत केली. या कार्यक्रमाला त्याचे वडील बलकौर सिंग आणि आई चरण कौर यांच्यासह मोठा प्रेक्षकवर्ग उपस्थित होता.
कलर्स टीव्हीवरील लोकप्रिय शो 'बिग बॉस २०' हा स्पर्धकांमधील अटीतटीच्या स्पर्धेमुळे आणि घरातील वादांमुळे सतत चर्चेत असतो. बिग बॉस २० जसजसा पुढे सरकत आहे ...
शुभदीप सिंग सिद्धूच्या सादरीकरणाला प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला. त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. LFHRI ने म्हटलंय की, आणखी एका व्हिडिओमध्ये अनेक प्रेक्षक त्याला पिस्तुलासारखी खूण करण्यास प्रोत्साहन देत असल्याचेही दिसून येत आहे. संस्थेचा युक्तिवाद आहे की, अडीच वर्षांच्या मुलाक़डून अशी कृती करून घेणे चुकीचे आहे. यामुळे त्याच्या मानसिकतेवर चुकीचा परिणाम होण्याची शक्यता आहे. मे 2022 मध्ये पंजाब राज्यात गोळ्या झाडून त्याची हत्या करण्यात आली होती. संस्थेचे म्हणणे आहे की, यामुळे शुभदीपलाही तशाच धोक्यांना सामोरे जावे लागू शकते. LFHRI ची मागणी आहे की, मुलाच्या आई- वडीलांनी त्याला योग्य ती शिकवण देणे महत्त्वाचं आहे.
पालकांनी मुलाला गोळीबार करण्यास किंवा शस्त्रासारख्या हालचाली करण्यास शिकवण्यास, प्रोत्साहन देण्यास किंवा परवानगी देण्यास मनाई करणारा अंतरिम आदेश जारी केला जावा. ही बंदी सार्वजनिक कार्यक्रम आणि इतर ठिकाणीही लागू व्हावी. संस्थेने अल्पवयीन मुलाच्या सुरक्षिततेसाठी आणि कल्याणासाठी, बाल न्याय (केअर अँड प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन) कायदा, 2015 च्या कलम 36 अंतर्गत कारवाई करण्याची आणि या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. LFHRI ने स्पष्ट केले की, ही तक्रार सिद्धू मुसेवालाच्या कुटुंबाविरुद्ध नाही. आमचा केवळ उद्देश हा त्या लहान मुलाची सुरक्षितता आणि कल्याण हा आहे.