Dhadak 2 : एक होता राजा...एक होती राणी...त्यांची जात वेगळी.. अन्...

करण जोहरकडून 'धडक २'ची घोषणा; आता चित्रपटात झळकणार ‘ही’ अभिनेत्री


'या' तारखेला होणार चित्रपट रिलीज


मुंबई : आठ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'सैराट' (Sairat) चित्रपटाने मराठी बॉक्स ऑफिसवर (Marathi cinema) कमाईचे विक्रम मोडीत काढले होते. प्रेक्षकांना वेड लावलेल्या या सैराटप्रमाणे २०१८ साली शशांक खेतानने दिग्दर्शित केलेला 'धडक' (Dhadak) चित्रपट प्रदर्शित झाला होता. यामध्ये जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) आणि ईशान खट्टरने पदार्पण केले होते. धडक चित्रपटाला जेमतेमच प्रतिसाद मिळाला असला तरीही यामधील सर्व गाणी सूपरहिट झाली होती. त्यातच आता बॉलीवूड (Bollywood) निर्माता करण जोहरने (Karan Johar) ६ वर्षांनी या सिनेमाच्या सीक्वेलची घोषणा केली आहे. 'धडक २' (Dhadak 2) हा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून यामध्ये नवी जोडी बघायला मिळणार असल्याचे करण जोहरने सांगितले.


'धडक २' चित्रपटाचे दिग्दर्शन शाजिया इक्बाल करणार आहेत. तर या सिनेमात अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी आणि अ‍ॅनिमल चित्रपटामुळे रातोरात प्रसिद्ध झालेली अभिनेत्री तृप्ती डिमरी (Tripti Dimri) ही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. निर्माता करण जोहर याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत चित्रपटाची घोषणा केली. यासोबत ही गोष्ट थोडी वेगळी आहे, 'एक होता राजा आणि एक होती राणी...त्यांची जात वेगळी होती...गोष्ट संपली'असं कॅप्शन देत सर्वांचं लक्ष वेधून घेतले आहे.



या तारखेला रिलीज होणार 'धडक २'


झी स्टुडिओ, धर्मा प्रोडक्शन आणि क्लाउड ९ पिक्चर्सच्या बॅनर अंतर्गत निर्मिती होत असलेला हा चित्रपट २२ नोव्हेंबर २०२४ रोजी रिलीज होणार आहे. त्यासोबत करण जोहरने दिलेल्या हटके कॅप्शनमुळे हा चित्रपट किती हिट करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.




Comments
Add Comment

Bhuvan Bam : भुवन बामच्या अडचणी वाढल्या! गुजरातमधील विद्यापीठातील कार्यक्रमात अश्लील कृती केल्याचा आरोप; गुन्हा दाखल

Bhuvan Bam: प्रसिद्ध यूट्यूबर आणि कॉमेडियन भुवन बाम एका नव्या वादात अडकला आहे. गुजरातमधील वडोदरा येथील पारुल

Paro Film : ‘पारो: वधू गुलामगिरीची अज्ञात कहाणी’ चित्रपट लवकरच; वधू तस्करीचा विषय मांडणारा नवा सिनेमा

महिलांची वधू म्हणून खरेदी-विक्री आणि त्यातून होणारे शोषण या गंभीर सामाजिक समस्येवर भाष्य करणारा ‘पारो: वधू

शिक्षकांच्या संघर्षाची गोष्ट सांगणारा ‘कबीर सर का आखरी लेसन’ इफ्फीमध्ये झळकला

काळ बदलला, वर्ग बदलले, फळ्याची जागा स्मार्ट बोर्डने घेतली. पण या बदलत्या काळात अनेक पिढ्या घडवणारे शिक्षक मात्र

Fulwara Marathi Movie: 'फुलवरा'चा लावणीसाज! वैदेही परशुरामी आणि प्रियदर्शिनी इंदलकर यांच्या नव्या लूकची चर्चा

Fulwara Marathi Movie: रवी जाधव दिग्दर्शित आणि झी स्टुडिओजची निर्मिती असलेल्या ‘फुलवरा’ या चित्रपटाची उत्सुकता आता

Tu Aahes Na: इफ्फीच्या मंचावर मराठी चित्रपटाची भावुक झलक! ‘तू आहेस ना’ला प्रेक्षकांचा प्रतिसाद

Tu Aahes Na: गोव्यात सुरू असलेल्या 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) येथे लव फिल्म्स फिल्म्सची

ऑस्कर 2027 च्या शर्यतीत 2 भारतीय चित्रपट! 'गोंधळ' आणि 'अँग'ने मिळवली पात्रता

Oscars 2027 : भारतीय चित्रपट 'गोंधळ' आणि 'अंग' यांनी ऑस्कर 2027 च्या शर्यतीत प्रवेश केला आहे. 'गोंधळ'ला आंतरराष्ट्रीय फीचर