Patole Vs Raut : पटोले म्हणतात 'काँग्रेस मोठा भाऊ', तर राऊत म्हणतात 'जो जिंकेल त्याची जागा'!

निकालानंतर मविआची खरे रंग दाखवण्यास सुरुवात


मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) निकालानुसार महाराष्ट्रात महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) बाजी मारली तर महायुतीला (Mahayuti) मात्र अपेक्षित यश मिळाले नाही. त्यात मविआमध्ये काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी 'काँग्रेस मोठा भाऊ ठरला' असं वक्तव्य केलं. त्यांचं हे वक्तव्य मविआचाच घटक पक्ष असलेल्या ठाकरे गटाच्या संजय राऊतांना (Sanjay Raut) पचलं नाही. त्यांनी या वक्तव्यावर 'कोणीही लहान मोठं नाही, जो जिंकेल त्याची जागा', असं म्हटलं आहे. त्यामुळे आता निकाल हाती आल्यावर मविआचे खरे रंग आणि अंतर्गत धुसफूस बाहेर यायला लागल्याचे चित्र आहे.


मविआच्या जागावाटपात सर्वाधिक जागा ठाकरे गटाने आपल्याकडे घेतल्या होत्या. ठाकरे गटाने २१ जागा लढवल्या, मात्र केवळ ९ जागांवर त्यांना विजय मिळवता आला. तर काँग्रेसने १७ जागा लढवल्या आणि १३ जागांवर विजय मिळवला. त्यामुळे काँग्रेसमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर नाना पटोले म्हणाले होते की, “आम्ही लोकसभा निवडणुकीतदेखील मोठ्या भावाची भूमिका निभावली. काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे. आमच्याबरोबर असलेले आधी गट होते आता पक्ष झाले आहेत. महाराष्ट्रात आमचा जेव्हा एक खासदार होता, तेव्हाही आम्ही मोठ्या भावाची भूमिका निभावली आहे. आजही निभावत आहोत. मात्र, लहान भावांनी लहान भावांसारखं वागावं”, असा खोचक टोला नाना पटोले यांनी लगावला होता.


यावर संजय राऊत यांनी प्रत्युत्तर देत म्हटलं की, “कोणीही लहान आणि कोणीही मोठा भाऊ नाही. महाराष्ट्रात शिवसेना एक महत्वाचा पक्ष आहे आणि यापुढेही राहील. आम्ही अत्यंत संघर्षातून आणि संकटातून पक्ष उभा केला आहे. लोकसभा निवडणुकीत जागा लढवल्या आहेत. काँग्रेससमोर तसं संकट नव्हतं. त्यांचं चिन्ह आणि पक्ष हा त्यांच्याकडे होतं. आम्ही महाराष्ट्रात प्रत्येकाला मदत केली आहे. आता पुढे महाराष्ट्रात जो जिंकेल त्याची जागा, असं ठरलं आहे”, असं संजय राऊत यांनी सांगितलं.


काँग्रेस आणि शिवसेनेसमोर असलेल्या आव्हानांची तुलना केल्याने तसेच महाविकास आघाडीचा विधानसभेचा फॉर्म्युल्याबाबत सांगताना जी जागा जो जिंकेल, ती त्याची असं म्हटल्याने संजय राऊतांनी मविआतील वाद सर्वांसमोर आणल्याचे चित्र आहे. येत्या काळात मविआमध्ये आणखी धुसफूस होणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Comments
Add Comment

Jaykumar Rawal : अत्याधुनिक सुविधा आणि सुरक्षिततेला प्राधान्य देत मुंबई विमानतळाजवळ ‘नंदगिरी राज्य अतिथीगृह’ उभारणार; मंत्री जयकुमार रावल यांची माहिती

मुंबई : विविध राज्यांतून मुंबईत येणाऱ्या मान्यवर अतिथींच्या निवासासोबतच ट्रान्झिट प्रवासादरम्यान

Nitesh Rane : मालेगावमध्ये आधुनिक मासळी बाजार उभारणीला गती

- सांगलीतील प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश मुंबई : वाशिम जिल्ह्यातील

Nitesh Rane : सिंधुदुर्गात कुक्कुटपालनाला चालना देण्यासाठी प्रभावी कार्यवाहीचे निर्देश; मंत्री नितेश राणे यांची माहिती

कुक्कुटपालनाला 'कृषी समकक्ष' दर्जा दिल्याने युवकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यात

Mumbai Trees Damaged by Cables : टेलिकॉम कंपन्यांच्या केबल्सचा झाडांना विळखा

तातडीने उपाययोजना राबवून कारवाई करण्याची वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत मागणी मुंबई : मुंबईत सध्या इंटरनेट,

Devendra Fadnavis : सुट्या खाद्य तेलाच्या विक्रीस वर्षभराची मुदतवाढ; मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय

पारंपरिक व्यावसायिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी समिती स्थापन करणार मुंबई : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए)

Ashish Shelar : दहिसर 'ट्रान्सपोर्ट हब'च्या कामादरम्यान 'ब्लास्टिंग' नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई करा!

- पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश; बाधित इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट, खनिज वाहतुकीची चौकशी करावी मुंबई : दहिसर