Water Crisis : पावसाळ्यातही मराठवाड्यावर जलसंकट!

'या' जिल्ह्यांना अजूनही पाणीटँकरचा पाणीपुरवठा


हिंगोली : मागील महिन्यात उन्हाच्या कडाक्यात अनेक गावांना पाणीटंचाईच्या (Water Crisis) समस्यांना सामोरे जावे लागत होते. महिलांना ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण करावी लागत होती. मात्र आता जून महिन्याला सुरुवात झाली असून मान्सूनचेही (Monsoon) आगमन झाले आहे. पावसामुळे नागरिकांना उन्हाच्या काहीली पासून काहीसा दिलासा मिळाला आहे. परंतु अजूनही अनेक गावांना पाणीबाणीच्या समस्यांचा सामना करावा लागत असल्याचे दिसून येत आहे.



मराठवाड्यात आजही टँकरने पाणीपुरवठा


दुष्काळी मराठवाड्यात यावर्षी मान्सून एक दिवस आधीच दाखल झाला. छत्रपती संभाजीनगरसह सर्वच मराठवाड्यात हा पाऊस धो-धो बरसला. पहिल्याच पावसात नद्या-नाले ओसंडून वाहू लागले. तर काही ठिकाणी नद्यांना पूर देखील आला. त्यामुळे पहिल्याच पावसात मराठवाड्यात पाऊसपाणी झाले. एकीकडे असे चित्र असताना आजही मराठवाड्यातील टँकरची संख्या कमी झालेली नाही. त्यामुळे ही टँकर लॉबी तर नाही ना, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.



पावसाळा सुरू होऊनही जिल्ह्यात १० टँकर सुरू


जून महिना लागून जवळपास दहा दिवस झाले. या महिन्यात चांगला दमदार पाऊस होऊनही पाणीटंचाई कायम आहे. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील अनेक गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी टँकर सुरू करण्यात आले आहेत. गावात दररोज टँकर येऊन त्यातील प्रत्येक घराला १५ घागर पाणी मिळते. नागरिकांना याच पाण्यामधून पिण्याच्या पाण्यासह इतर कामासाठी देखील वापर करावा लागत आहे. नागरिकांना पावसाळा सुरु झाल्यावर पाणीटंचाई भासणार नाही असे वाटत होते, मात्र अजूनही नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत असल्यामुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.



'या' शहरात पाणीटँकरने पाणीपुरवठा



  • छत्रपती संभाजीनगर येथे ५५५ गाव वाड्यांवर ७४१ टँकर सुरू आहेत.

  • जालना ४७५ गाव वाड्यांवर ५४२ टँकर सुरू आहेत.

  • बीड ७३९ गाव वाड्यांवर ४६८ टँकर सुरू आहेत.

  • परभणी ३२ गाव वाड्यांवर ३३ टँकर सुरू आहेत.

  • हिंगोली १० गाव वाड्यांवर १० टँकर सुरू आहेत.

  • नांदेड ४० गाव वाड्यांवर ३९ टँकर सुरू आहेत.

  • धाराशिव १०२ गाव वाड्यांवर १५० टँकर सुरू आहेत.

  • लातूर ४७ गाव वाड्यांवर ४१ टँकर सुरू आहेत.


दरम्यान, गेल्या काही वर्षात मराठवाडा दुष्काळ आणि टँकर हे एक जणू समीकरण बनले आहे. यातूनच टँकर लॉबी सारखा प्रकार समोर आल्याचे अनेकदा पाहायला मिळाले. त्यामुळे धो धो पाऊस पडूनही मराठवाड्यातील दुष्काळ कधी मिटणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

Comments
Add Comment

Dagdusheth Halwai Ganpati : कारगिल, जम्मू, अयोध्या, राजस्थानसह सीमावर्ती भागात ‘दगडूशेठ’ गणपतीची प्रतिष्ठापना

पुणे : महाराष्ट्रासह देशभरात प्रसिद्ध असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची (Dagdusheth Halwai Ganpati) भक्ती देशाच्या सीमेवर

MahaBhumi Stack : आता एका क्लिकवर मिळणार जमीन सर्च रिपोर्ट! महाराष्ट्रात महाभूमी स्टॅकचा मोठा निर्णय

मुंबई : राज्यातील जमीन व्यवहार अधिक पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी महसूल व वन विभागाने ‘महाभूमी स्टॅक’ ही

Dr Sampada Munde Case : डॉ. संपदा मुंडे आत्महत्येप्रकरणी छाननी समिती स्थापन

मुंबई : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमण्यात

Maharashtra Weather Update : सप्टेंबरच्या सुरुवातीलाच हवामान बदलणार; विदर्भात जोरदार पावसाची शक्यता

मुंबई : महाराष्ट्रात ऑगस्ट महिन्यात पावसाने काहीशी ओढ दिल्यानंतर सप्टेंबरच्या सुरुवातीला हवामानात बदल

Jalgaon : काल वाढदिवस...आज काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश, चिमुकल्याला झोळीत गळफास

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे अत्यंत धक्कादायक अन् हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पहिल्या वाढदिवस ,

Medha Kulkarani : धार्मिक उत्सवात अशा कार्यक्रमांची गरज काय...; गणेशोत्सवात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमावरून वाद

पुणे : महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आणि श्रद्धेने साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाला राज्यभरात सुरुवात झाली आहे.