Ticket Fine : फुकट्या रेल्वे प्रवाशांवर कारवाईचा दंडुका!

दोन महिन्यांत ६३ कोटींचा दंड वसूल


मुंबई : मागील काही दिवसांपासून रेल्वेने विनातिकीट (Without Ticket) प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. यामध्ये जनरलचे तिकीट काढून स्लीपर तसेच एसी कोचमधून प्रवास करणाऱ्यांचा देखील मोठ्या प्रमाणात समावेश आहे. या प्रवाशांमुळे तिकीटधारक प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. यासंदर्भात अनेक तक्रारी देखील प्राप्त झाल्या आहेत. विनातिकीट प्रवाशांमुळे मध्य रेल्वेचे (Central Railway) उत्पन्न देखील घटल्याचे समोर आले आहे. ही बाब लक्षात घेता मध्य रेल्वेकडून विशेष तिकीट तपासणी मोहिम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत मध्य रेल्वेने कोटींचा गल्ला जमवला आहे. (Without Ticket Fine)


मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेने फुकट्या रेल्वे प्रवाशांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. रेल्वेस्थानक तसेच प्लॅटफॉर्मवर सध्या विशेष तिकीट तपासणी मोहिम सुरू आहे. मागील दोन महिन्यात रेल्वेने ९ लाख फुकटे प्रवासी पकडले आहेत. त्यांच्याकडून तब्बल ६३ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे विनातिकीट प्रवास करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणादणले आहेत.


यामध्ये ४.०७ लाख प्रवासी एकट्या मुंबई विभागातील आहेत. तर भुसावळ विभागात १.९३ लाख विनातिकीट प्रवासी पकडण्यात आले आहेत. याशिवाय नागपूर विभागातील १.१९ लाख, सोलापूर विभागातील ५४.०७ हजार आणि पुणे विभागातील ८३.१० हजार हजार विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे. या सर्व प्रवाशांकडून एकूण ६३.६२ कोटींचा दंड वसूल करण्यात आला आहे. ही मोहिम यापुढेही सुरू राहणार असल्याचे रेल्वेच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Comments
Add Comment

सर्वोच्च न्यायालयाने महापालिका आयुक्तांवरील निर्बंध घेतले मागे

मुंबई (विशेष प्रतिनिधी): माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिनांक ३ नोव्हेंबर २०२६ रोजी दिलेल्या आदेशांचे पालन

पश्चिम रेल्वेचा 76 वा स्थापना दिवस, रेल्वेच्या गौरवशाली प्रवासाचे प्रदर्शनातून होणार दर्शन

मुंबई: पश्चिम रेल्वेकडून 5 नोव्हेंबर 2026 रोजी अर्थात उद्या 76 वा स्थापना दिवस साजरा करणार आहे. राष्ट्राच्या सेवेतील

Western Railway: विनातिकिट प्रवाशांमुळे पश्चिम रेल्वे मालामाल, फुकट्या प्रवाशांकडून 138 कोटींचा दंड वसूल

मुंबई: पश्चिम रेल्वेने विनातिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाईचा बडगा उचलला आहे. पश्चिम रेल्वेने आपल्या

Western Railway: सणासुदीच्या काळामध्ये पश्चिम रेल्वेचा प्रवाशांसाठी महत्त्वाचा निर्णय, 'या' सहा स्थानकांवर निर्बंध

मुंबई: पश्चिम रेल्वेने सणासुदीच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अवघ्या काही दिवसांवर दिवाळी सण येऊन

Siddhivinayak Temple: सिद्धिविनायक न्यासाला राम मॅन्शनच्या खरेदीवरील मुद्रांक शुल्क माफ, भाविकांच्या सुविधांसाठी निर्णय

मुंबई: प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी सुविधा वाढविण्याच्या दृष्टीने

Mumbai News: एक वर्षाच्या चिमुकल्यावर लिव्हर ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया यशस्वी; डॉक्टरांनी बाळाला दिलं जीवनदान

मुंबई: मुंबईतील नारायण हेल्थ एसआरसीसी चिल्ड्रन्स हॉस्पिटलमध्ये एका वर्षाच्या बाळावर गुंतागुंतीची