मुंबई: मुंबईतील नारायण हेल्थ एसआरसीसी चिल्ड्रन्स हॉस्पिटलमध्ये एका वर्षाच्या बाळावर गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करण्यात आली. सहा किलो वजनाच्या एक वर्षाच्या चिमुकल्यावर लिव्हर ट्रान्सप्लांटची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया व्यवस्थित पार पडल्यामुळे सर्वत्र कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. बाळाला जन्मजातच यकृताचा गंभीर आजार होता. त्यामुळे यकृताचा एक भाग त्याच्या आईने स्वत:च्या यकृताचा भाग दान केला आहे. यकृत प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेला तब्बल 10 तासांचा अवधी लागला. एका वर्षाच्या बाळावर गुंतागुंतीची शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्याच्या तब्येतीत आता सुधारणा होत असल्याची प्रतिक्रिया त्याच्या पालकांकडून दिली जात आहे. या शस्त्रक्रियेमुळे चिमुकल्याला नवं आयुष्य मिळालं आहे.
एक वर्षाच्या चिमुरड्याला 'अलागिल सिंड्रोम' नावाचा अनुवांशिक या दुर्मिळ आजाराचे निदान झाले होते. ते बाळ अलागील सिंड्रोममुळे झालेल्या यकृताच्या गंभीर आजारामुळे त्रस्त होता. हा एक दुर्मिळ असून अनुवांशिक जनुकीय विकार आहे. ह्या आजाराचा विशेषत: परिणाम व्यक्तीच्या यकृतासह अनेक अवयवांवर होतो. मूत्रपिंड आणि हृदयाच्या समस्या, रक्त गोठण्यास अडथळा आणि तीव्र पोषण कमतरतेमुळे त्याची प्रकृती अधिकच गुंतागुंतीची झाली होती. बाळाला त्याच्या जन्मानंतर त्वचेला खाज येणे आणि लघवीचा रंग गडद होणं अशी समस्या जाणवत होती. आठ महिन्यांनंतर त्वचेला येणारी खाज अधिकच वाढली होती. शिवाय त्याच्या तब्येतीत व्यवस्थित वाढ नव्हती होत, पण त्याचं पोट फुगत होतं.
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (बेस्ट) उपक्रमाच्या बस स्थानकासाठी आरक्षित असलेल्या बोरिवली पूर्व येथील भूखंडावरील ...
अलागील सिंड्रोममुळे एका वर्षाच्या बाळाचं वजन सहा किलो इतकं झालं होतं. त्यानंतर डॉक्टरांनी केलेल्या तपसाणीमध्ये बाळाच्या रक्तातील बिलीरुबिनचं प्रमाण वाढल्याचं आढळून आलं होतं. शिवाय, त्याच्या रक्त गोठण्याच्या प्रक्रियेतही गंभीर बिघाड झाला होता. स्कॅनमध्ये यकृतावर व्रण आणि गाठी दिसून येत होत्या. यकृताची बायोप्सी आणि संपूर्ण एक्सोम सिक्वेन्सिंगसह केलेल्या जनुकीय चाचण्यांमुळे डॉक्टरांना त्या बाळाला 'अलागील सिंड्रोम' नावाचा अनुवांशिक दुर्मिळ आजार असल्याचे निष्पन्न झाले. या आजारामुळे बाळाच्या यकृत, फुफ्फुसासह शरीरातील इतर अवयवांनाही नुकसान होण्याची शक्यता आहे. बाळाच्या शरीरातील अनेक अवयवांवर या आजाराचे इफेक्ट पडत होते.
रक्तातील आम्लाचं प्रमाण वाढलं की, रेनल ट्युब्युलर अॅसिडोसिस होतो. फुफ्फुसांच्या छोट्या रक्तवाहिन्या काही प्रमाणात आकुंचन पावल्या होत्या. सोबतच बाळाच्या फुफ्फुसांमधील रक्तदाबही किंचित वाढला होता. शरीराला आवश्यक असलेल्या चरबीत विरघळणाऱ्या जीवनसत्त्वांची कमतरता असल्यामुळे त्याची तब्येतही खूप कमजोर झाली होते. सोबतच, बाळाला पोषणही व्यवस्थित मिळत नसल्यामुळे त्याचे तब्येतही कमजोर झाली होती. आईने आपल्या लेकाला यकृत प्रत्यारोपण करण्याचा निर्णय घेतला. त्याचं वजन कमी असल्यामुळे, हृदय, किडनी आणि शरीरातील रक्त गोठण्याची समस्या असे जटील आव्हान असल्यामुळे डॉक्टरांच्या ही शस्त्रक्रिया करणे म्हणजे मोठे आव्हान होते. रूग्णालयातील डॉक्टरांनी ते आव्हान लिलया पेलले.
रविवारी (1 नोव्हेंबर) नाहूर पश्चिम येथील नालंदा बुद्ध विहार हॉलमध्ये आयोजित एका लग्नसमारंभात अन्नातून विषबाधा झाल्याची खळबळजनक घटना समोर आली होती. या ...
गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेसाठी, डॉ. संजय कुमार गोजा आणि डॉ. अशोक थोरात यांच्या नेतृत्वाखाली इतरत्र डॉक्टरांच्या टीमने आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. डॉक्टरांनी सर्वप्रथम कॅलरी आणि प्रोटीनची पूरक मात्रा देऊन बाळाची पोषण स्थिती सुधारली आणि जीवनसत्त्वांची कमतरता दूर केली. जनुकीय तपासणीत याची पुष्टी झाली की, त्याच्या आईमध्ये ओळखलेला JAG1 जनुकीय प्रकार आढळला नाही. सर्वसमावेशक वैद्यकीय तपासणीनंतर बाळाच्या आईला आपल्या बाळाला यकृताचा काही भाग दान करण्याची परवानगी देण्यात आली. रक्तवाहिन्या जोडण्यासाठी आणि यकृताला पुरेसा रक्तपुरवठा सुरळित करण्यासाठी डॉक्टरांच्या समोर मोठे आवाहन होते.
प्रत्यारोपन केलेल्या यकृताला सुरळीत रक्त पुरवठा करून देण्यासाठी अत्यंत बारकाईने रक्तवाहिन्या जोडण्यात आल्या. शरीरात होणारा रक्तस्त्राव, शरीराचं तापमान, रक्तातील आम्लाचं संतुलन आणि यकृताला होणारा रक्तप्रवाहावर सातत्याने लक्ष ठेवण्यात आले. डॉक्टरांच्या टीमने 10 तास चाललेली यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली. 10 तास चाललेल्या शस्त्रक्रियेदरम्यान, डॉक्टरांनी त्या बाळाचे खराब असलेले यकृत काढून टाकले आणि दान केलेला भाग प्रत्यारोपित केला. रक्तवाहिन्या आणि पित्तनलिका जोडण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर, बाळाचे यकृत प्रत्यारोपण केल्यानंतर सात दिवस अतिदक्षता विभागात आणि आणखी आठ दिवस हाय- डिपेंडन्सी वॉर्डमध्ये बाळावर शस्त्रक्रिया करण्यात आले. शस्त्रक्रियेनंतर पाच दिवसांनी बाळाच्या आईला डिस्चार्ज देण्यात आला.
Mumbai News : औषधे, खाद्यपदार्थ आणि अन्य वस्तूंच्या पॅकेजिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या अॅल्युमिनियम फॉइलचे उत्पादन करणाऱ्या मुंबईतील एका कंपनीविरोधात ...
डॉक्टरांनी बाळाच्या यकृताचे कार्य, मूत्रपिंडाचे आरोग्य, रक्ताच्या गोठण्याची प्रक्रिया, किडनीचं आरोग्य आणि शरीरातील पाण्याचं प्रमाण यावर डॉक्टरांनी सातत्याने लक्ष ठेवले. बाळाला हळूहळू तोंडावाटे अन्न द्यायला सुरुवात केली शस्त्रक्रियेनंतर 15 दिवसांनी त्याला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला.