Ashadhi Wari : तुकोबा विठोबाच्या भेटीला! भक्तीमय वातावरणात प्रशासनाची वारीसाठी जय्यत तयारी

पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सजली


देहू : आषाढीची चाहूल लागताच मनाला ओढ लागते ती पंढरीच्या वारीची. असंख्य वारकरी कित्येक किलोमीटरचा रस्ता पायी चालत पांडुरंगाच्या भेटीला जातात. आषाढी वारी (Ashadhi Wari 2024) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या पायी पालखी सोहळ्यासाठी देहूनगरी (Dehu) सज्ज झाली असून प्रशासनही (Administration) वारकऱ्यांची विशेष काळजी घेण्यासाठी सज्ज झाले आहे. भाविक व वारकऱ्यांसाठी ठिकठिकाणी पिण्याचे पाणी, आरोग्य केंद्रासह पालखी परिसरात स्वच्छतेची काळजी देखील घेतली जात आहे.


अशातच आज संत तुकाराम महाराजांची पालखी प्रस्थान होणार आहे. यामुळे परिसरात भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. त्यासोबत वारकरी पूजाअर्चा व भजन करीत असल्याने सध्या देहूत भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. श्री संत तुकाराम महाराज संस्थान व नगरपंचायत प्रशासनाकडून तयारी करण्यात आली आहे.



भाविकांची राहण्यासाठी तारांबळ 


विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, वैकुंठगमन मंदिर, येलवाडी येथील भागीरथी माता मंदिर, विठ्ठलनगर येथील पादुका मंदिर व चिंचोली पादुका मंदिर, अनगडशहावली दर्गा परिसरात भाविकांची गर्दी आहे. परिसरात तुरळक पाऊस पडत असल्याने भाविकांची राहण्यासाठी तारांबळ उडत आहे. तर ठिकठिकाणी मोठ्या गृह प्रकल्पांच्या पार्किंगमध्ये, खासगी व प्राथमिक शाळेच्या आवारात व वर्ग खोल्यांमध्ये तात्पुरती सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.



प्रस्थान कार्यक्रम



  • पहाटे ४.३० - महापूजा

  • ५ ते ७ - काकडा

  • ८ ते ९ - गाथा भजन

  • १० ते १२ - काल्याचे किर्तन

  • १२ ते १ - जरीपटका सन्मान

  • १ ते २ - पादुका पूजन व सत्कार

  • दुपारी २ - पालखी प्रस्थान

  • सायंकाळी ६ - पालखी मुक्काम

  • रात्री ९ ते ११ - किर्तन, जागर


महापालिकेची तयारी



  • शीघ्रकृती दलाचे स्वतंत्र पथक

  • सोहळ्यावर ड्रोनद्वारे नजर

  • मुक्कामाच्या ठिकाणी सोयीसुविधा

  • दिंडीप्रमुखांचा सत्कार

  • पालखी मार्गावर वृक्षारोपण

  • फिरती शौचालये, तात्पुरती स्नानगृहे

  • वीस हजार सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध

Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी