IND vs SA Final: फायनलवर पावसाचे सावट, जर सामना रद्द झाला तर कोण बनणार चॅम्पियन?

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४चा(t-20 world cup 2024) फायनल सामना बार्बाडोस स्थित केनसिंगटन ओव्हल स्टेडियममध्ये खेळवला जाईल. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील हा खिताबी सामना २९ जूनला होणार आहे. मात्र आतापर्यंत वर्ल्डकपच्या अनेक सामन्यांमध्ये पावसाचा खेळ रंगला आहे.


आता बातमी समोर आली आहे की २९ जूनला बार्बाडोसमध्ये पाऊस येण्याची शक्यता आहे. दरम्यान फायनल सामन्यासाठी ३० जूनचा दिवस रिझर्व्ह डे म्हणून ठेवला आहे. जर २९ जूनला भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना पावसामुळे खेळला गेला नाही तर त्या स्थितीत काय होईल?



जर भारत-दक्षिण आफ्रिका सामन्यात आला पाऊस


भारत वि दक्षिण आफ्रिका फायनल सामन्याच्या दिवशी बार्बाडोसमध्ये ७५ टक्के पावसाची शक्यता आहे. जर फायनल सामना पावसामुळे अथवा अन्य कारणामुळे उशिराने होत असेल तर त्या दिवशी सामना पूर्ण करण्यासाठी १९० मिनिटांचा अतिरिक्त वेळ लागेल. सामन्याचे निकाल तेव्हाच लागू शकतात जेव्हा दोन संघ कमीत कमी १०-१० षटकांचा खेळ करेल. जर एखादा संघ १०-१० षटकांचा खेळ करू शकले नाही तर सामना रिझर्व्ह डेच्या दिवशी शिफ्ट केला जाईल.



जर रिझर्व्ह डेच्या दिवशी झाला पाऊस


आयसीसीच्या नियमांतर्गत फायनल सामना होऊ शकला नाही अथवा टाय झाल्यास सुपर ओव्हर केली जाऊ शकते. जर रिझर्व्ह डेला कोणताही संघ विजेता बनू शकला नाही अथवा सुपर ओव्हरही झाली नाही तर फायनल सामन्याचा निकाल नो-रिझल्ट म्हणून घोषित केला जाईल. सुपर ओव्हर नसल्याच्या स्थिती भारत आणि दक्षिण आफ्रिका यांना संयुक्तपणे विजेते घोषित केले जाईल. दरम्यान, टी-२० वर्ल्डकच्या १७ वर्षांच्या इतिहासात आतापर्यंत संयुक्त विजेतेपद दिले गेलेले नाही.

Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून