Vishalgad Encroachment : विशाळगडावर अतिक्रमण हटाव मोहिमेला हिंसक वळण!

स्थानिकांना मारहाण, दगडफेक झाल्याचा आरोप


संभाजीराजेंच्या भूमिकेवर हिंदुत्ववादी संघटनांचा आक्षेप


कोल्हापूर : संभाजी राजे छत्रपती यांनी विशाळगडावरील अतिक्रमण हटवा मोहिमेसाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. ते आज विशाळगडाकडे (Vishalgad) शेकडो कार्यकर्त्यांसह रवाना झाले. मात्र, या मोहिमेला हिंसक वळण लागलं आहे. विशाळगडावरील स्थानिकांवर हल्ला झाल्याचा प्रकार घडला आहे. इतकेच नव्हे तर बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांवर सुद्धा हल्ला झाल्याचा आरोप होत आहे. दगडफेकीचे व्हिडिओ देखील व्हायरल झाले आहेत.


संभाजी राजे छत्रपती यांनी पोलिसांनी गडाकडे जाऊ नका, असं आवाहन केलं आहे. संभाजीराजे यांनी विशाल गडाकडे कोणत्याही परिस्थितीत जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आज सकाळी तुळजाभवानीचे दर्शन घेत ते विशाळगडाकडे रवाना झाले. यावेळी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते, जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली.



काय म्हणाले संभाजी राजे छत्रपती?


दरम्यान, आयुष्यातील पहिला गुन्हा विशाळगडावर जात आहे म्हणून दाखल झाल्यास मला अभिमानच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी आम्ही विशाळगडावर पोहोचत आहोत. ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त असला तरी आम्ही विशाळगडावर जाणारच, असे राजे यांनी म्हटले आहे.


दुसरीकडे, स्वराज्य संघटनेचे उपाध्यक्ष अंकुश कदम यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या किल्ल्याने संकटात मदत केली तोच विशाळगड किल्ला संकटात आहे, आज विशाळगडाचे अतिक्रमण मुक्त करणारच, असे म्हटले आहे.



संभाजीराजेंच्या भूमिकेवर हिंदुत्ववादी संघटनांचा आक्षेप


दुसरीकडे संभाजी राजे यांनी घेतलेल्या भूमिकेवर हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेप घेतला आहे. प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना संभाजी राजे हे आंदोलन का करत आहेत, हे अनाकलनीय असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. संभाजीराजेंनी याबाबत राजकारण न करता राज्यातील सर्व गडावरील अतिक्रमण मुक्त करण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि विशाळगडावर अतिक्रमण प्रशासनाने काढावीत. अन्यथा वक्फ बोर्डाच्या जमिनीवरच हिंदुत्ववादी संघटना मंदिर बांधतील, असा इशारा विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष कुंदन पाटील यांनी दिला आहे.



पर्यटकांना आणि भाविकांना गडावर जाण्यास मनाई


किल्ले विशाळगडावर कोणताही अनुचित प्रकार घडून यासाठी बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे पर्यटकांना आणि भाविकांना गडावर जाण्यास मनाई करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी अमोल शेडगे यांनी शनिवारी रात्री सुद्धा शिवभक्तांना सहकार्य करण्याचा आवाहन केलं होतं. तसेच संभाजीराजे यांना चर्चेचं आवाहन केलं होतं. मात्र, संभाजी राजे यांनी चर्चेस नकार दिला आहे.


Comments
Add Comment

Sangli crime news : तोंडातून पांढरा फेस अन् उग्र वास; कौटुंबिक वादातून पती-पत्नीचा संशयास्पद मृत्यू; सांगलीत खळबळ

सांगली : सांगली जिल्ह्यातील पलूस शहरातून एक अत्यंत सुन्न करणारी घटना समोर आली आहे. घरगुती वादाच्या कारणावरून एका

Jalgaon Crime : धावत्या रेल्वेत दिवा लावून पूजा, प्रवाशावर रेल्वेची कारवाई

Jalgaon Crime : धावत्या रेल्वेच्या डब्यात दिवा लावून धार्मिक विधी करणाऱ्या प्रवाशाविरुद्ध मध्य रेल्वेने कारवाई केली

Chandrapur ashram school food poisoning : चंद्रपुरात भयंकर प्रकार! वरणाच्या पातेल्यात शिजली पाल; आश्रमशाळेतील ३१ विद्यार्थ्यांना विषबाधा!

महाराष्ट्र शासनाने आश्रमशाळांमधील सुविधांबाबत मुंबई उच्च न्यायालयात सकारात्मक माहिती दिल्यानंतर लगेचच ही

Dr Sampada Munde Suicide Case : डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट; गृह विभागाकडून उच्चस्तरीय समिती स्थापन

सातारा : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणाने राज्यात

Maharashtra Weather Update : पुढचे ४८ तास अत्यंत महत्त्वाचे! महाराष्ट्रातील 'या' १३ जिल्ह्यांमध्ये धो-धो पावसाचा इशारा

मुंबई : ऑगस्ट महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यानंतर आता मान्सूनच्या शेवटच्या टप्प्याकडे सर्वांचे

Dagdusheth Halwai Ganpati : कारगिल, जम्मू, अयोध्या, राजस्थानसह सीमावर्ती भागात ‘दगडूशेठ’ गणपतीची प्रतिष्ठापना

पुणे : महाराष्ट्रासह देशभरात प्रसिद्ध असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची (Dagdusheth Halwai Ganpati) भक्ती देशाच्या सीमेवर